5 November 2024 8:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

'थर्टी फर्स्ट'च्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोट्यवधींचे ड्रग्जनिर्मिती रसायन हस्तगत

मुंबई : तरुणाईला जाळ्यात अडकविण्यासाठी आणि ड्रग्ज बनवण्यासाठी परदेशात छुप्या मार्गाने पाठवण्यात येणाऱ्या रसायनांचा प्रचंड मोठा साठा मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. हा साठा तब्बल १०० किलो असून याची याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जवळपास १००० कोटीच्या घरात असल्याचा अंदाज पोलिस सूत्रांनी प्रसार माध्यमांना दिला आहे.

अमेरिका सारख्या देशात बंदी असलेल्या आणि हजारो सामान्यांच्या मृत्यूचे कारण बनलेल्या पेन्टॅलिन या रसायनाची मुंबईतून प्रचंड प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या सूत्रांनी दिली होती मिळाली.

त्याच माहितीच्या आधारे अंमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटच्या अधिकाऱ्यांनी मुंबई अंधेरी येथे छापा टाकून सलीम डोला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी, घनःश्याम तिवारी या सर्व संशयितांना ताब्यात घेतले. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पेन्टॅलिन हे रसायन सापडले.दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे या रसायनाचा साठा करण्याचा परवाना असल्याचा दावा करण्यात आला आहे. महानगर दंडाधिकारी न्यायालयाने या सर्व आरोपींना १ जानेवारी २०१९पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x