22 December 2024 11:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाला भरमसाट बिल, मनसेकडून सुटका, पोलिसात तक्रार दाखल

MNS leader Ganesh Chukkal, corona patient, Hindu Sabha hospital

मुंबई, १० जून: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने मंगळवारी ९० हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने सर्वत्र गर्दी वाढत असताना कोरोनाचा संसर्ग होण्याचा वेग कमी होत नसल्याने एकीकडे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून अनेक खाजगी इस्पितळं रुग्णांवर भरमसाठ बिलं आकारात असल्याचं देखील समोर आलं आहे. इस्पितळांच्या मनमानी कारभाराला रुग्णांचे नातेवाईक देखील कंटाळल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

तशीच घटना आणि अनुभव पुन्हा घाटकोपरमधील हिंदुसभा रुग्णालयात घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे स्थानिक मनसेच्या पदाधिकाऱ्याने थेट इस्पितळात धाव घेऊन कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाची इस्पितळातून सुटका केली आहे. मात्र संतापलेल्या इस्पितळाने मनसेच्या पदाधिकाऱ्यावर रुग्णालयातून एका कोरोनाच्या रुग्णाला पळवून नेल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे.

दरम्यान मनसेचे पदाधिकारी गणेश चुक्कल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, सदर रुग्णावर यशस्वी उपचार झाल्यानंतर देखील रुग्णालयात बिल वाढवण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे संबंधित रुग्णाचे बिल जवळपास ३ लाख ८० हजारांहून अधिक झाले होते. हे बिल भरण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर वारंवार रुग्णाच्या नातेवाईकांना फोन करत होते. मात्र हे बिल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांची मानसिक परिस्थिती खालावली होती. तसेच रुग्णावर उपचार झाल्यानंतर त्यांच्यामध्ये कोणतेही कोरोनाची लक्षणं दिसत नव्हती, तरीदेखील रुग्णाला रुग्णायात ठेवण्यात आले होते, असा आरोप गणेश चुक्कल यांनी केला आहे.

हिंदुसभा रुग्णालयाला आम्ही बिल कमी करण्याची विनंती केली. मात्र रुग्णालय कमी करण्यास तयार नव्हते. तसेच महापालिकेने सावित्री बाई फुले यांच्या योजने अंतर्गत उपचार करा असे निर्देश दिले असताना देखील जास्त बिल आकारण्यात आले आहे, असा आरोप गणेश चुक्कल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.

 

News English Summary: A local MNS official rushed to the hospital and released the patient from the hospital. However, the enraged hospital has lodged a complaint with the police against the MNS official for abducting a corona patient from the hospital.

News English Title: A case has been registered against MNS leader Ganesh Chukkal for abducting a corona patient from Hindu Sabha hospital News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x