23 December 2024 5:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

सरकार म्हणतं बेड्स आहेत, पण सामान्यांना बेड मिळेनात - सविस्तर वृत्त

Covid 19, jumbo isolation centers

मुंबई, ६ जून: राज्यात कोरोनाचे २४३६ नवे रुग्ण आढळेल असून एकूण संख्या आत ८० हजार २२९ च्या घरात पोहचली आहे. तसंच राज्यात आज १३९ मृत्यू झाले असून आतापर्यंत एका दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे. शिवाय आज १४७5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत ३५ हजार १५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंतच्या मृत्यूची नोंद २ हजार ८४९ इतकी आहे.

दरम्यान, राज्यात सद्यस्थिती ४२ हजार २१५ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. वाढणाऱ्या चाचण्यांमुळे रोज कोरोना रुग्णांची मोठी संख्या देखील समोर येत आहे. तर यातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढलेली दिसत आहे. मागील तीन चार दिवसांपासून डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या हजार, बाराशेच्या घरात आहे. त्यामुळे राजतातील जनतेसाठी नक्कीच ही एक दिलासादायक बाब आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात जम्बो आयसोलेशन सेंटर्स उभारण्यात आली आहेत. राज्य सरकारकडून अजूनही काही भागांमध्ये हे सेंटर उभे करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात या आयसोलेशन सेंटरमध्ये करोना रुग्णच नाहीत. तसेच डॉक्टर आणि नर्सेसची कमतरता असल्यामुळेही जम्बो आयसोलेशन सेंटरमध्ये पेशंट नाहीत. ती रिकामीच आहेत. त्यामुळे बेड मिळत नसल्याने करोना रुग्णांचे अजूनही हाल होत असून या जम्बो आयसोलेशन सेंटरचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाच आयसोलेशन सेंटरमध्ये मिळून ३ हजार बेड्स उपलब्ध आहेत, पण तिथे फक्त ५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गोरेगाव नेस्को येथे सर्वात मोठे १२४० बेड्सचे जम्बो आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे, पण तिथे फक्त ५० रुग्ण दाखल आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल येथे १०८० बेड्सचे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे, पण तिथे एकही रुग्ण नाही. महालक्ष्मी रेसकोर्स येथे ३५० बेड्सचे आयसोलेशन सेंटर आहे. ते अजून रुग्णांसाठी सुरू झालेेले नाही. करोना रुग्णांची संख्या वाढूनही हे आयसोलेशन सेंटर रिकामे राहत असल्यामुळे ही सेंटर्स पांढरा हत्ती ठरत असल्याचा आरोप आरोग्य तज्ज्ञांकडून होत आहे.

मे महिन्याच्या आरंभापासून वाढत्या करोनाच्या बंदोबस्तासाठी किंवा रुग्णांच्या उपचारासाठी महाआघाडी सरकार कसे कंबर कसून राबते आहे आणि त्यात विरोधी पक्ष कसा व्यत्यय आणतो आहे; त्याच्या रसभरीत चर्चा समाज माध्यमातून होत होत्या, पण जे दावे राज्य सरकारकडून करण्यात आले. ते किती खरे होते आणि किती खोटे हे आता उघडकीस येऊ लागले आहे.

पण सध्याची परिस्थिती फारच गंभीर असल्यामुळे ती दृश्ये सर्वसामान्यांना दिलासा देणारी नव्हती. अनेक भागातून बाधा झालेल्यांना रुग्णवाहिका मिळत नाहीत वा जिथे रुग्ण मृत्युमुखी पडला, तिथेही त्याचा मृतदेह हलवायला जागा नसल्याच्या बातम्या येतच होत्या.

 

News English Summary: A large number of jumbo isolation centers have been set up in Mumbai to treat corona patients. The state government is still in the process of setting up the center in some areas. However, in reality, there are no corona patients in this isolation center. There are also no patients in the Jumbo Isolation Center due to the shortage of doctors and nurses. They are empty.

News English Title: A large number of jumbo isolation centers have been set up in Mumbai to treat corona patients News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x