15 January 2025 11:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

अमृता फडणवीस यांचा कम्युनिटी हेल्थचा वर्कशॉप अन कागदावर 'फोटो लेते रहो'

A photo of Amrita Fadnavis, social media, Photo Lete Raho

मुंबई, 9 जुलै: विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अमृता फडणवीस यांची एका फोटोवरून सोशल मीडियावर तूफान खिल्ली उडवली जात आहे. विशेष म्हणजे अमृता यांचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमृता फडणवीस या कम्युनिटी हेल्थ सर्व्हिस 2019-20 अंतर्गत वर्कशॉपमध्ये सहभागी झाल्या होत्या. वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. तसेच ‘समाजोपयोगी आरोग्य उपक्रमाची गरज आणि परिणाम’ या विषयावर अमृता यांनी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. दरम्यान, अमृता यांनी सोशल मीडियावरया या वेबिनारचे फोटो शेअर केले आहे. यामधील एका फोटोवरून त्या आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत.

या पोस्टमध्ये अमृता फडणवीस कॉम्प्युटरसमोर खुर्चीवर बसलेल्या दिसतात. मात्र फोटोच्या एका कोपऱ्यात दिसणाऱ्या कागदावर हलकसा मजकूर हाताने लिहिलेला दिसत आहे. याच मजकुरावरुन सध्या अमृता फडणवीस नेटिझन्सचं लक्ष्य ठरल्यात. अमृता फडणवीस यांचा फोटो झूम करून पाहिला, तर एका कागदावर ‘फोटो लेते रहो’ अशी सूचना लिहिलेली दिसते. तीच चर्चेचा आणि चेष्टेचा विषय ठरलीय.

 

News English Summary: A photo of Amrita Fadnavis is being ridiculed on social media. What is special is that Amrita’s photo is now going viral on social media.

News English Title: A photo of Amrita Fadnavis is being ridiculed on social media News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x