23 December 2024 5:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मुंबईतील महिलांसाठी आनंदाची बातमी | प. रेल्वेवर लेडीज स्पेशल ट्रेन सुरु होणार

covide19, lockdown, western railway, ladies special train

मुंबई, २७ सप्टेंबर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईची लाईफ लाईन असलेली रेल्वे सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होतायत. रोडवरील ट्रॅफीक आणि बसच्या धक्काबुक्कीतून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. त्यामुळे ट्रेन लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी सर्व स्तरातून होतेय. दरम्यान मुंबईतील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

पश्चिम रेल्वेवर लेडीज स्पेशल ट्रेन पुन्हा सुरु होणार आहे. लॉकडाऊन घोषित झाल्यापासून पहिल्यांदाच मुंबईत लेडीज स्पेशल ट्रेन धावणार आहे. विरारहून चर्चगेटसाठी सकाळी ७.३५ ची तर चर्चगेटहुन विरारसाठी संध्याकाळी ६.१० ची लेडीज स्पेशल ट्रेन धावणार आहे. या निर्णयामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पश्चिम रेल्वेवर सहा लोकलच्या फेऱ्यांमध्ये सोमवार पासून वाढ होणार आहे. ज्यात दोन फेऱ्या या लेडीज स्पेशल असणार आहेत. सध्या ५०० लोकलच्या फेऱ्या सुरू आहेत. त्या वाढून आता ५०६ फेऱ्या होणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील आणि राज्य शासनाने मान्यता दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच लोकलने सध्या प्रवास करता येतोय. आता लेडीज स्पेशल ट्रेनमुळे महिलांचा आनंद वाढलाय.

 

News English Summary: Indian Railway’s Western Railway zone has decided to further increase the number of special suburban services in Mumbai from Monday. At present 500 special suburban services are being operated by Western Railway for essential services staff. In order to maintain social distancing and to avoid overcrowding, Western Railway has decided to increase the number of daily special suburban services from 500 to 506, by adding six more services including two Ladies Special trains from 28 September

News English Title: After covide19 lockdown western railway run ladies special train Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#railway(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x