राज ठाकरे यांची महत्वाच्या विषयांवर शरद पवारांशी फोनवर चर्चा
मुंबई, ३० ऑक्टोबर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली होती. राज्यातील वाढीव वीज बिल प्रश्नाविषयी राज ठाकरेंनी भेट घेतली होती. त्यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यास राज ठाकरे यांना सांगितले होते.
त्यानंतर राज ठाकरे म्हणाले कि, वाढीव वीज बिलाप्रश्नी राज्यपालांशी चर्चा करण्यात आली. गेली अनेक दिवस माझा पक्ष, कार्यकर्ते प्रकरणी आंदोलन करत आहेत. परंतु, याप्रकरणी कंपन्या एमईआरसीकडे बोट दाखवत आहेत, दुसरीकडे एमईआरसी आमचे काही दडपण नाही म्हणत आहे.
तसेच, नितीन राऊत यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊ सांगितले, पण अजून तो होत नाही. याविषयी शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला राज्यपालांकडून देण्यात आला आहे. याप्रकरणी नागरिकांना लवकरात लवकर दिलासा देण्यात यावा. या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोलणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले होते.
अखेर राज यांनी राज्यपालांचा सल्ला मान्य करत शरद पवारांशी फोनवर चर्चा केली आहे. दूध उत्पादक शेतकरी आणि वाढीव वीज बिलाच्या मुद्यांवर आज राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी राज यांनी सर्वसामन्याच्या वीज बिलात झालेली वाढ कमी करण्यात यावी, याबद्दल चर्चा केली.
तसंच, ‘आज दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था एका लिटरमागे शेतकऱ्याला 17 ते 18 रुपये देतात आणि त्यावर भरघोस नफा कमवत असतात. कधी सुका दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. वाढत्या महागाईमुळे गुरांची देखभाल करणे महाग झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका लिटरमागे 27 ते 28 रुपये मिळावे’, अशी मागणीही राज ठाकरेंनी केली. यावेळी राज्यपालांच्या भेटीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे कळतंय.
राज ठाकरे यांनी 29 ऑक्टोबर रोजी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ आणि वाढीव वीज बिलाबद्दल राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन दिले होते. यावेळी राज्यपालांनी शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला होता. ‘लॉकडाउनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले आहे. याबद्दल आम्ही राज्य सरकारशी बोललो. पण, त्यावर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही. म्हणून राज्यपालांची भेट घेतली असल्याचे राज यांनी सांगितले होते.
त्याचबरोबर, ‘एका छोट्याशा विषयाला इतका वेळ लावण्यात आला आहे. कळतं नाही नेमकं काय अडकलं आहे. त्यामुळे या विषयावर लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोलणार आहे’, असंही राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार, आज राज यांनी शरद पवारांशी फोनवर चर्चा केली.
News English Summary: Raj Thackeray had also said that he would talk to Chief Minister Uddhav Thackeray and Sharad Pawar soon. Finally, Raj accepted the governor’s advice and had a phone conversation with Sharad Pawar. Today, Raj Thackeray had a phone conversation with Sharad Pawar on the issues of milk producing farmers and increased electricity bills. At this juncture, Raj discussed the need to reduce the increase in electricity bills.
News English Title: After the meeting to governors MNS Chief Raj Thackeray phone conversation with Sharad Pawar News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER