11 January 2025 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; आर्थिक चणचण जाणवत असेल तर घरच्या घरी तुफान चालणारे व्यवसाय सुरू करा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Railway Ticket Booking | 90 टक्के रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्लीपर कोचच्या भाड्यात AC कोचने प्रवास करू शकता Step Up SIP Calculator | पगारदारांनो, स्टेप-अप SIP ऑप्शन'मधून मोठा परतावा मिळवा, अशा प्रकारे 1 कोटी रुपये कमाई होईल 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI
x

शेतकऱ्यांच्या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून गेला असता : सामाना

मुंबई : शेतकऱ्यांच्या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून गेला असता अशी भीती सत्ताधाऱ्यांमध्येमोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय दुसरा मार्ग सरकारकडे राहिला नसल्याची टीका सामानातून फडणवीस सरकारवर करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या राजधानीत थडकलेल्या शेतकरी वादळाचा तडाखा खूप मोठा होता आणि त्यामुळेच सरकारला लेखी आश्वासन देणे भाग पडलं. शेतकऱ्यांनी मुंबईत येऊन दिलेली ‘थप्पड की गुंज’ फडणवीस सरकारच्या कायमचीच स्मरणात राहील असा सणसणीत टोला शिवसेनेच्या मुखपत्रातून सत्ताधाऱ्यांना लागण्यात आला आहे.

मुंबईत थडकलेल्या शेतकऱ्यांच्या वादळाला पुढे आश्वासनांची लेखी हमी देण्याशिवाय फडणवीस सरकारकडे दुसरा मार्गच उरला नव्हता. आता तरी दिलेलं आश्वासन पाळा नाहीतर शेवटची संधी ‘शेवटची काडी’ ठरेल असा इशाराही सेनेच्या मुखपत्रातून फडणवीस सरकारला देण्यात आला.

आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर बोचरी टीका केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, नाशिकहून १८० किमीच अंतर कापत शेतकरी आणि आदिवासींचा मोर्चा राजधानी मुंबईत परतला आणि सरकारकडून लेखी आश्वासन घेऊनच माघारी परतला. शेतकरी आणि आदिवासींच्या या अभूतपूर्व मोर्चातून सेनेला फडणवीस सरकारवर सामानातून निशाणा साधण्याची नामी संधीच मिळाली आहे.

पुढे असेही म्हटले आहे की कालपर्यंत जे सरकार शेतकरी आणि आदिवासींच्या मोर्च्याबाबत ढिम्म होते ते सोमवारी अचानक संवेदनशील झालं. शेतकरी आणि आदिवासींच्या आक्रोशाचा आवाजच ज्यांच्या कानापर्यंत पोहोचत नव्हता ते एकदम त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक झाले असं नमूद करत फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.

सरकारच्या ऑनलाईन आणि पारदर्शक गोंधळामुळेच संपूर्ण कर्जमाफीचा प्रश्न आजही पेटलेलाच आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्याच्या शिवसनेच्या मागणीचेच ऐतिहासिक रूप गेल्या वर्षी शेतकरी संपात दिसले होते आणि त्यावरच शिवसेनेने जे रान पेटवले होते त्यामुळेच सरकारला शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी लागली होती. परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीत घातलेल्या जाचक अटी आणि शर्तीं मुळेच संपूर्ण कर्जमाफी हा केवळ एक फार्सच ठरला होता असं ही अग्रलेखात म्हटले आहे.

हॅशटॅग्स

#Kisan Mrcha(3)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x