24 November 2024 8:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

अवैध बांधकाम आणि रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर | कंगनाच्या कार्यालयाबाहेर पालिकेची नोटीस

Shivsena Kangana Ranaut, office sealed BMC, illegal construction, Marathi News ABP Maza

मुंबई, ८ सप्टेंबर : ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची काल मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.

कंगनाच्या कार्यालयात सध्या रंगरंगोटीचं काम सुरू आहे. त्यांचीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जुजबी चौकशी केली. कार्यालयाशेजारी असणाऱ्या बंगल्यांचीदेखील पाहणी करण्यात आली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी शेजारीच असलेल्या रस्त्यांचीही मोजणी केली होती. त्यामुळे आता पालिका काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान, कंगना रानौत आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध सुरू असताना आता कंगनाचं मुंबईतील कार्यालय महापालिकेच्या रडारवर आहे. काल पालिका अधिकाऱ्यांनी कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाची पाहणी केली. यानंतर आज कार्यालयाबाहेर नोटीस लावण्यात आली आहे. कंगनाच्या कार्यालयातील अवैध बांधकाम करण्यात आलं असून रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. कंगनानं नियमांचं उल्लंघन केल्यानं तिच्या कार्यालयाबाहेर ३५४ अ अंतर्गत नोटीस चिकटवण्यात आली आहे.

कंगनानं कार्यालयात बांधकाम करताना मुंबई महापालिकेच्या अधिनियम ३५४ अ चं उल्लंघन केल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पालिकेच्या नोटिशीत सात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. इमारतीचं बांधकाम पालिकेच्या नियमानुसार झालेलं नाही. दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचं बांधकाम अनधिकृतपणे करण्यात आलं आहे. नकाशात बेडरुमसोबत शौचालयं दाखवण्यात आलं होतं. कागदपत्रांत शौचालयं दाखवण्यात आलेली जागा प्रत्यक्षात मात्र ये-जा करण्यासाठी वापरण्यात आली आहे, असे पालिकेनं नोटिशीत म्हटलं आहे.

 

News English Summary: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has issued a ‘stop work notice’ to Kangana Ranaut under section 354(A) of the Mumbai Municipal Corporation Act and has told the Bollywood actor to produce permission within 24 hours. The BMC has pasted the notice outside Kangana’s office in Mumbai a day after BMC workers visited Manikarnika films- Kangana’s production house office.

News English Title: AMID conflict shivsena Kangana Ranaut office sealed BMC said illegal construction Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x