23 February 2025 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office FD Vs RD | पोस्ट ऑफिस FD की RD, 5 लाखांच्या ठेवीवर जास्त फायदा कुठे मिळेल येथे जाणून घ्या Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार
x

कोरोना आणि पेंग्विन महा सरकार | हे दोन व्हायरस निष्पाप लोकांवर कधीही....

Amruta Fadanvis, Tweet on Shivsena, Troll Sammet Thakkar, social media

मुंबई, २५ ऑक्टोबर: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. करोना विषाणू आणि पेंग्विन महा सरकार विषाणू कधीही निष्पाप लोकांवर ग्रासतील हे सांगता येत नाही, असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस यांचं ट्विट:
कोरोना आणि पेंग्विन महा सरकार हे दोन व्हायरस निष्पाप लोकांवर कधीही, कुठे, कसे ग्रासतील हे सांगता येत नाही. क्वारंटाइन होण्यापासून आपला बचाव करा.. त्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा आणि नियमित मास्क वापरा. सुरक्षित राहा! गप्प बसा!

समित ठक्करने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी नागपूर पोलिसांनी आज (२४ ऑक्टोबर) अटक केली आहे. युवासेनेचे पदाधिकारी धर्मेंद्र मिश्रा यांनी समित ठक्कर विरोधात तक्रार केली होती. आरोपी समित हा भाजपचा आयटी सेलचा कार्यकर्ता आहे, असा दावा तक्रारदारांनी केला आहे.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना राणौत यांच्यात जुंपली होती. यानंतर आता दसऱ्याच्या शुभेच्छा देताना कंगनानं संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे. कंगनानं ट्विटरवर हनुमानाच्या मूर्तीचा आणि मुंबईतल्या कार्यालयाचा फोटो शेअर केला आहे. ‘माझी तुटलेली स्वप्नं तुमच्या चेहऱ्यासमोर हसत आहेत संजय राऊत. पप्पू सेना माझं घर तोडू शकते. पण माझ्या आत्म्यावर घाला घालू शकत नाही. बंगला क्रमांक ५ आज सत्याचा असत्यावर विजय साजरा करत आहे,’ असं म्हणत कंगनानं दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

News English Summary: Former Chief Minister Devendra Fadnavis’s wife and singer Amrita Fadnavis has once again tweeted and castigated Shiv Sena. Amrita Fadnavis has tweeted that the Corona virus and the Penguin Maha Sarkar virus will never infect innocent people.

News English Title: Amruta Fadanvis Tweet on Shivsena Troll Sammet Thakkar social media News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x