17 April 2025 10:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

देशमुख यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली | आता अनिल देशमुख जामीनासाठी अर्ज करु शकतात

Anil Deshmukh in Court custody

मुंबई, ०६ नोव्हेंबर | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शनिवारी (6 नोव्हेंबर) विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान, ईडीने कोठडीची मागणी केली होती. पण कोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावत त्यांना न्यायालयीन कोठडीत धाडलं आहे. दरम्यान, आता अनिल देशमुख यांची (Anil Deshmukh in Court custody) रवानगी तुरुंगात होण्याची शक्यता आहे. पण असं असलं तरीही कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आता अनिल देशमुख हे आपल्या जामीनासाठी अर्ज करु शकतात.

Anil Deshmukh in Court custody. Anil Deshmukh is likely to be sent to jail. However, Anil Deshmukh can now apply for bail as the court has remanded him in judicial custody :

अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले. देशमुख यांना शनिवारी स्पेशल हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान, ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने त्याला नकार देत देशमुख यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय सुनावला.

यापूर्वी ईडीने अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख याला चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्याला चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, देशमुख यांच्या वकिलाने हृषिकेश देशमुख याच्या वतीनेही अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला ज्यावर कोर्टात 12 नोव्हेंबर 2021 रोजी सुनावणी होणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Anil Deshmukh in Court custody now he can apply for bail.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या