5 November 2024 6:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

कठीण क्षणी आई, अर्धांगिनी-मुलं सोबत राहिली; यात अंजली दमाणियांचा जळफळाट का? सविस्तर

MNS, Raj Thackeray, Anjali Damania, ED Notice

मुंबई : कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आल्यानंतर ते चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. दादरच्या कृष्णकुंज या निवासस्थानावरुन राज हे सहकुटुंब ईडीच्या कार्यलयात अंदाजे साडे अकराच्या सुमारास दाखल झाले आहेत. राज हे सहकुटुंब चौकशीसाठी गेल्याच्या मुद्द्यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. राज ठाकरे चौकशीला चाललेत की सत्यनारायणाच्या पूजेला? असा सवाल दमानिया यांनी ट्विटवरुन विचारला आहे.

राज ठाकरे यांची चौकशी २२ तारखेला म्हणजेच आज होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाल्यानंतर मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान मोठ्या बंदोबस्तामध्ये राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला आणि मुलगा अमित, मुलगी उर्वशी आणि बहीण यांच्या सोबत पावणे अकराच्या सुमारास कृष्णकुंजवरुन ईडीच्या कार्यलयाच्या दिशेने रवाना झाले.

मात्र अंजली दमानिया यांना ट्विट करुन यासंदर्भात प्रश्न उपस्थित करता राज यांनी सहकुटुंब चौकशीला जाणे हे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याची टिका केली आहे. “राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडी’च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? का सहानुभूती गोळा करण्याचा हा प्रयत्न (आहे.)” असं ट्विट दमानिया यांनी केलं आहे.

वास्तविक काँग्रेस सत्तेत असताना जेव्हा राज ठाकरे यांना उत्तर भारतीय राजकरणावरून अटक करण्यात आली होती. त्यावेळी देखील त्यांच्या अर्धांगिनी शर्मिला ठाकरे थेट पोलीस स्थानकाबाहेर सनदशील मार्गाने आंदोलनाला बसल्या होत्या जशा अंजली दमानिया देखील आंदोलन करतात. राजकारणात असले तरी कुटुंब व्यवस्था हा महत्वाचा घटक आजही ठाकरे कुटुंबीयांमध्ये आहे. मग लग्न समारंभ असो किंवा आजारपण असो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे देखील एकत्र दिसले आहेत. त्यात जन्मदाती आई, मुलं आणि सून त्यांच्या घरातील प्रमुखासोबत खंबीरपणे उभे राहिले यात अंजली दमाणियांना का त्रास झाला ते समजण्या पलीकडे आहे.

त्यात अंजली दमानिया यांना भलतेच प्रश्न उपस्थित केले असून ईडीच्या प्रश्नांना उत्तरं राज ठाकरेच देणार आहेत आणि सोबत गेलेल्या कुटुंबाला आतमध्ये प्रवेश नसणार आहे याची अंजली दमाणियांना माहिती नसावी. मात्र देखील अंजली दमाणियांना ड्रामा दिसते आहे हे विशेष. वास्तविक संपूर्ण कुटुंबाने शांती ठेवण्याच्या अधिकृत सूचना दिल्या आहेत आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना देखील कायदा सुव्यस्थेच्या कारणावरून अटक करण्यात आलं आहे. त्यात राज ठाकरे स्वतः लगेच कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकणार नाहीत. त्यामुळे पक्षाची तांत्रिक बाजू समजल्यास आणि कुटुंबव्यवस्था समजून घेतल्यास यात काहीच वावगं नसल्याचं अनेकांनी मत व्यक्त केलं आहे.

वास्तविक अण्णा हजारेंच्या चेहरा पुढे करून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या किरण बेदी भारतीय जनता पक्षाच्या मर्जीने राज्यपाल, अण्णांच्या सोबत असणारे आज अण्णांच्या आजूबाजूला देखील फिरकताना दिसत नाहीत. त्यातीलच एक म्हणजे अंजली दमानिया देखील आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. देशात घडणाऱ्या इतर गंभीर विषयांवरून शांत असणाऱ्या दमानिया यांना सध्या एखाद्या कुटूंबाची कठीण काळातील एकी इतकी का खुपावी हे समजण्यापलीकडील असलं तरी समाज माध्यमांवर त्यांच्यावर तुफान टीका होताना पाहायला मिळत आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x