23 February 2025 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

फक्त अर्णव गोस्वामीला जगायचा अधिकार आहे का? पत्रकारिता अशी असते का?

Anvay Naik, Bhawana Naik, Arnab Goswami

मुंबई, ४ नोव्हेंबर: आज अर्णब गोस्वामीला अटक झाली आणि अन्वय नाईक या मराठी उद्योजकच्या पत्नीने आणि मुलीने पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारचे आभार मानले. यावेळी अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम माध्यमांच्या समोर कथन केला.

यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, ‘वयाच्या १४व्या वर्षी नववीत असताना मी अन्वय नाईक यांच्या प्रेमात पडले, आज करवाचौथला त्याचं फळ मिळालं, अशा भावना अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी व्यक्त केल्या. Republic TV’चे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक या मायलेकींनी पत्रकार परिषद घेतली आणि अनेक मुद्दे माध्यमांसमोर मांडले.

माझ्या नवऱ्याने सुसाईड नोटमध्ये तिघांची नावं लिहिली होती, पण त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नव्हती, आज महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली, मी त्यांची शतश: आभारी आहे, असं अक्षता नाईक म्हणाल्या. अर्णव गोस्वामींसारखी माणसं काम करुन घेतात आणि पैसे देत नाहीत. अर्णव यांनी सूडबुद्धीने हे सर्व केलं आहे, माझ्या पतीला पैसे मिळाले असते तर ते जिवंत असते, तब्बल 83 लाख रुपये बाकी आहेत, फिरोजकडून ४ कोटी, इतरांकडून येणं होतं, पण तेही देऊ नका असे अर्णवने सांगितल्याचा धक्कादायक दावा अक्षता नाईक यांनी केला.

आम्ही जगायचं नाही का, फक्त अर्णव गोस्वामीला जगायचा अधिकार आहे का? पत्रकारिता अशी असते का? आमचे फोन टॅप केले होते, आम्ही संजय बर्वे, सुरेश वऱ्हाडे यांनाही भेटलो होतो. अर्णव गोस्वामींना अटक झाली हे खूप चांगलं झालं, त्या तिघांची नावं सुसाईड नोटमध्ये लिहिली आहेत, त्यांना यापूर्वीच अटक व्हायला हवी होती, मात्र का झाली नाही, मला माहिती नाही, असंही अक्षता नाईक म्हणाल्या.

दरम्यान संपूर्ण विषय महाराष्ट्राने ऐकल्यावर समाज माध्यमांवर मराठी उद्योजक नाईक कुटुंबियांना मराठी नेटिझन्सचा पूर्ण पाठिंबा मिळताना दिसत, ज्याला अपवाद ठरत ठरत आहेत ते भारतीय जनता पक्षाचे समर्थक. एकूण राज्यातील किंवा देशातील भाजपाला मराठी उद्योजक नाईक कुटुंबियांबद्दल कोणतीही आत्मीयता किंवा सहानुभूती असल्याचं दिसत नाही हे विशेष म्हणावे लागेल.

 

News English Summary: Don’t we want to live, only Arnav Goswami has the right to live? Is that what journalism is all about? Our phones were tapped, we also met Sanjay Barve, Suresh Varhade. “It is good that Arnav Goswami was arrested. The names of the three are mentioned in the suicide note. They should have been arrested earlier, but I don’t know why,” said Akshata Naik.

News English Title: Anvay Naik family made many allegations over Arnab Goswami News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x