22 November 2024 3:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अन्वय नाईक प्रकरण | सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिलेला नसताना फडणवीसांनी दिशाभूल केली

Anvay Naik's wife, Devendra Fadnavis

मुंबई, ११ मार्च: मनसुख हिरेन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विधानसभा हादरवून ठेवली तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात का घेतली नाही. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फक्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पण विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी निकाल दिल्याचे सांगून दिशाभूल केली, असा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला. (Anvay Naik’s wife and daughter held a press conference in Mumbai made allegations against Fadnavis)

अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने गुरुवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन भाजप सरकारवर गंभीर आरोप केले. या दोघींनी मनसुख हिरेन प्रकरणाचा दाखला देत भाजपला धारेवर धरले. एका व्यक्तीला दोन ते तीन दिवसांत न्याय मिळतो. फक्त संशयावरुन अधिकाऱ्याची बदली केली जाते. परंतु, आमच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे स्पष्टपणे आहेत. मग तेव्हा भारतीय जनता पक्षाने विधानसभा हादरवून का सोडली नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.

आम्हाला ज्या धमक्या येत आहेत त्याचं काहीच नाही का? आम्हाला अद्यापही धमक्या दिल्या जात आहेत असं अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी सांगितलं. “अर्णब गोस्वामी जेलमधून बाहेर पडल्यावर सर्वांसमोर धमकी देत होता, आम्हाला दोन दिवस झोप लागली नाही,” असं त्या म्हणाल्या. आमची केस दाबली गेली असून त्याची चौकशी करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

आमच्यावर हात टाकण्यात आला होता. तेव्हाच्या तपास अधिकाऱ्याला कोणाचा आदेश होता हेदेखील बाहेर काढावं. मी आणि आई मनाचं काही सांगत नाही आहोत. आम्ही संशय व्यक्त करत नसून सुसाईड नोटमध्ये नाव देण्यात आलं आहे. तपास अधिकाऱ्याला आमची चौकशी करण्याचा आदेश कोणी दिला होता? ज्यांना समस्या आहे त्यांनी चर्चेला बसावं.. चाय पे चर्चा होऊन जाऊ द्या,” असं आव्हान यावेळी आज्ञा नाईकने दिलं. तसंच किरीट सोमय्यांचा जीव वर खाली का होतो? असा सवाल विचारला.

अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक यांनी यावेळी महाराष्ट्र पोलिसांचा आपल्याला अभिमान असल्याचं सांगितलं. तसंच गरज लागल्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ अशी माहिती दिली.

 

News English Summary: Anvay Naik’s wife and daughter held a press conference in Mumbai on Thursday and leveled serious allegations against Devendra Fadnavis and the then BJP government. The duo took the BJP to task, citing the Mansukh Hiren case. A person gets justice in two to three days. Only on suspicion is the officer transferred. However, in our case the crime was filed, the names of the accused are clearly in the suicide note. Naik’s family then asked why the BJP did not shake the assembly and leave.

News English Title: Anvay Naik’s wife and daughter held a press conference in Mumbai made allegations against Fadnavis news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x