15 November 2024 6:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

आरेची जागा राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस राज्य सरकारची मंजुरी

Approval, preliminary notification, Mumbai Aarey colony, Reserve forest

मुंबई, ८ ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार आरे दुग्ध वसाहत (दुग्धव्यवसाय विकास विभाग) च्या ताब्यातील 288.43 हेक्टर व वन विभागाच्या ताब्यातील 40.46 हेक्टर जमीन अशी एकूण 328.90 हेक्टर जमीन ही भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4 अन्वये राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस आज मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

आरे दुग्ध वसाहत येथील जमीन ही राखीव वन म्हणून घोषित करावी याबाबत दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांना निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज दुग्ध व्यवसाय विभाग व वन विभाग यांच्याकडून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4 ची प्राथमिक अधिसूचना व मनोदय घोषित करण्याची अधिसूचना काढण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार प्राथमिक अधिसूचनेस मंजुरी प्रदान केली आहे. त्यानंतर चौकशी होऊन भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 20 ची अंतिम अधिसूचना काढण्यात येईल, असेही वनमंत्र्यांनी सांगितले.

प्राथमिक अधिसूचनेनुसार वन जमाबंदी अधिकारी (कोकण) नवी मुंबई हे या जमिनीवरील हक्क, स्वरूप, व्याप्ती याबाबत चौकशी करतील तर त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्याकडे अपील करता येईल, अशी माहितीही वनमंत्री राठोड यांनी दिली.

 

News English Summary: As per the directions of Chief Minister Uddhav Thackeray and Environment Minister Aaditya Thackeray, a total of 328.90 hectares of land belonging to 288.43 hectares of land belonging to Aarey Dairy Colony (Dairy Development Department) and 40.46 hectares of land owned by Forest Department has been declared as reserved forest under Section 4 of Indian Forest Act 1927. Approval has been given, informed Forest Minister Sanjay Rathore.

News English Title: Approval preliminary notification declaring Mumbai Aarey colony area reserve forest minister Minister Sanjay Rathoad Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x