#BabyPenguin ट्विटवर ट्रेंड, युवासेनेकडून पोलिसात तक्रार दाखल

मुंबई, १६ जुलै : ट्विटरवर #BabyPenguin हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. यामध्ये ठाकरे सरकारची थेट मुघल राजशी तुलना करणाऱ्या एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा हॅशटॅग अधिकच ट्रेंड होऊ लागला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, युवासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी ट्विटर युजर समीत ठक्कर याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. पण यामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत का आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
विशेष म्हणजे ज्या व्यक्तीमुळे हा ट्रेंड सुरु झाला आहे त्या व्यक्तीला म्हणजे समीत ठक्करला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा फॉलो करत असल्याने युवासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. समीत ठक्कर विरोधात व्ही पी रोड पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचं वृत्त आहे. तसेच समीत ठक्करने ट्विटमध्ये राज्यातील मोठ्या नेत्यांबद्दल अवमानकारक भाषा वापरल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
सदर विषयात झालंय असं की, समीत ठक्कर याने ट्विटला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. १ जुलै रोजी करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नव्या काळातील औरंगजेब असा केला असून आदित्य ठाकरे यांना मोहम्मद आझम शाह उर्फ बेबी पेंग्विन असं म्हटलं आहे.
दरम्यान, पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर समीर ठक्कर याने आपली बाजू मांडताना, “आपण फक्त कठोर भाषेचा वापर केला असून हे असंवैधानिक नाही. जर माझी पोस्ट आक्षेपार्ह होती तर ट्विटने ती काढली का नाही ? सरकारवर टीका करण्याच्या माझ्या लोकशाही अधिकाराचा मी वापर केला आहे,” असं म्हटलं आहे.
News English Summary: The hashtag #BabyPenguin is currently trending on Twitter. The hashtag has become a trend after a complaint was lodged in Mumbai against a social media user who compared the Thackeray government to the Mughal Raj.
News English Title: Baby Penguin Trending On Twitter After User Targets Minister Aaditya Thackeray News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, गडगडतेय शेअर प्राईस, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IREDA