16 April 2025 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

बकरी ईद घरीच साजरी करा, मुख्यमंत्र्यांचं मुस्लीम बांधवांना आवाहन

Bakrid Eid 2020, Wari and Ganeshotsav, CM Uddhav Thackeray, Coronavirus, lockdown

मुंबई, १४ जुलै : राज्यात कोरोनाव्हायरचे नवे रुग्ण अजूनही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे कुठल्याही कारणासाठी गर्दी करणं परवडणारं नाही, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बकरी ईद घरीच साजरी करा, असं आवाहन केलं आहे. च्या प्रादुर्भावामुळे यावर्षी वारकऱ्यांनीही चांगला निर्णय घेत वारीला जाणं टाळलं. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यानीही या वर्षी गणेश प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांनीही घरातच ईद साजरी करावी, असं ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बकरी ईद संदर्भात बैठक घेतली. अनेक लोकप्रतिनिधींनी ईद साजरी करण्यासाठीच्या काळात मटण उपलब्ध कसं करून देणार याविषयी विचारणा केली होती. शक्य असेल तिथे ऑनलाईन मटण विक्रीस प्राधान्य द्यावं. मटण शॉप्स जिथे असतील तिथून किंवा ऑनलाइन पद्धतीने ऑर्डर घेता येईल का याबाबत उपाय योजना करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ‘हा व्हायरस रोखायचा असेल तर गर्दी होऊ देताच कामा नये. मी मुल्ला मौलवींशी यासंदर्भात चर्चा करीन”, असंही ठाकरे म्हणाले.

तत्पूर्वी, ‘बकरी ईद हा सण मुस्लिम समाजासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्या दिवशी कुर्बानी देणे अनिवार्य असते. हा सण जवळ आल्यानंतरही सरकारने याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मुस्लिम समाज आणि संघटनांमध्ये अस्वस्थता आहे,’ असे नसीम खान यांनी पत्रात म्हटले आहे. ‘सरकारने काही अटी शर्थीच्या आधारे गणेशोत्सवास परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे बकरी ईदलाही परवानगी दिली जावी, तसेच कुर्बानीतून सूट दिली जावी,’ असे खान यांनी म्हटले आहे.

 

News English Summary: The number of new coronavirus patients in the state is still increasing exponentially. Therefore, it is not possible to crowd for any reason, saying that Chief Minister Uddhav Thackeray has appealed to celebrate Bakri Eid at home.

News English Title: Bakrid 2020 has to celebrate at home like Wari and Ganeshotsav CM Uddhav Thackeray on coronavirus lockdown maharashtra News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या