15 January 2025 5:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

‘बेस्ट’चा संपामुळे तिसऱ्या दिवशी सुद्धा मुंबईकरांचे हाल

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम राहिल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल पाहायला मिळत आहेत. दरम्यान, संप सलग तिसऱ्या दिवशीसुद्धा बेस्टचे सुद्धा मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ‘बेस्ट’ला या संपामुळे अंदाजे ५ ते ६ कोटींच्या महसुलाचा फटका बसल्याचे वृत्त आहे. आज संपावर तोडगा निघाला नाही तर बेस्टच्या कार्यालयीन विभागातील कर्मचारी सुद्धा संपात सामील होतील असं सांगण्यात येत आहे.

दीर्घकाळापासून प्रलंबित मागण्यासंदर्भात बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने बेमुदत संप पुकारला होता जो अजून मिटला नाही. या संपाला सोमवारी मध्यरात्रीपासूनच सुरुवात झाली होती. आज गुरुवारी सुद्धा बेस्टच्या आगारात बस अजून उभ्याच करून ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, बुधवारी संप मिटवण्यासाठी मुंबई महापालिकेप्रमाणे इतर मार्गाने सुद्धा प्रयत्न झाले. परंतु त्यानंतर संप अधिकच चिघळला आहे. कारण संबंधित मागण्यांसदर्भात संपूर्ण दिवसभरात घडलेला घटनाक्रम निष्क्रिय ठरला आहे. त्यामुळे आज कोणता तोडगा निघतो का ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x