22 April 2025 8:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

बिहार विधानसभा निवडणुक 2020 | शिवसेनेकडून २० स्टार कॅम्पेनर्स सज्ज

Bihar assembly Election 2020, Shivsena Star Campaigners

मुंबई, ८ ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना देखील सज्ज झाली आहे. बिहारच्या निवडणुकीत शिवसेना उतरणार असल्याचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी नुकतेच जाहीर केले होते. त्यानंतर आता शिवसेनेने आपल्या स्टार कॅम्पनेर्सची यादी देखील जाहीर केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून २० जण स्टार कॅम्पेनर सज्ज झाले आहेत. २०१५ मध्ये शिवसेनेनं ८० जागा लढवत २ लाखांपेक्षा जास्त मतं घेतली होती.

या स्टार कॅम्पेनर यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह २० जणांचा समावेश आहे. सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहूल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनील चिटणीस, योगराज शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी आणि अशोक तिवारी हे स्टार कॅम्पेनर असणार आहेत.

शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडं ही यादी सोपावली आहे. शिवसेना बिहारमध्ये ५० जागा लढवण्याच्या तयारीत आहे. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधात शिवसेना प्रचारात उतरणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण आता जेडीयूने गुप्तेश्वर पांडेंचे तिकिट कापल्याचे वृत्त आहे. आता शिवसेनेची रणनिती काय असणार ? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

बिहार निवडणुकीत शिवसेना ५० जागांवर निवडणूक लढवणार आहे. असं असलं तरी त्यांना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही. बिहार विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसंच निवडणुकीचे निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येतील.

 

News English Summary: Shiv Sena is also ready for Bihar Assembly election 2020. Senior leader Subhash Desai had recently announced that Shiv Sena would contest the Bihar elections. Since then, Shiv Sena has also announced its list of star campaigners. Shiv Sena has 20 star campaigners ready for Bihar Assembly elections.

News English Title: Bihar assembly Election 2020 Shivsena Star Campaigners List announced Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या