भाजप नगरसेवक मुरजी पटेलांचं नगरसेवक पद लघुवाद न्यायालयाकडून रद्द

मुंबई: मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकनं वाढली आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८१ मधून विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुरजी पटेल यांचं नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा आज लघुवाद न्यायालयात न्यायमूर्ती स्वर्णिता महालेंनी केली. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या संदीप नाईक यांचा नगरसेवकपदाचा मार्ग मोकळा झाला. एकाच आठवड्यात शिवसेनेचं महापालिकेतलं संख्याबळ दोननं वाढलं आहे.
शिवसेनेचे अंधेरी पूर्वेकडील आमदार रमेश लटके याच मतदासंघातील विद्यमान आमदार आहेत आणि युती झाल्याने ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यानंतर भाजपाचे नगरसेवक मुरजी पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. मात्र जवळपास ४० हजाराच्या घरात मतं घेऊन त्यांनी शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांचा मार्ग कठीण केला होता.
तत्पूर्वी, जातीच्या दाखल्याअभावी पालिकेतील एकूण ५ नगरसेवकांवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत त्यांचे नगरसेवक पद रद्द केलं होतं. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांचे खंडपीठ निकाल जाहीर केला होता. त्यामुळे इतर पक्षातील दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना ३, कॉंग्रेस १ आणि समाजवादी पक्षाच्या १ उमेदवारांना नगरसेवकपदाची मोठी लॉटरी लागली होती.
मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २८ मधील काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव, प्रभाग क्रमांक ६७ मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सुधा सिंग, प्रभाग क्रमांक ७६ मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका केशरबेन पटेल, प्रभाग क्रमांक ८१ मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मुरजी पटेल, प्रभाग क्रमांक ९० मधील काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने यापूर्वीच फेटाळले होते.
Web Title: BJP corporator Murji Patel post is canceled by court today.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL