भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळेंचं कोरोनामुळे मुंबईतील इस्पितळात निधन
जळगाव, १६ जून: महाराष्ट्रात काल दिवसभरात 2 हजार 786 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 10 हजार 744 वर पोहोचला आहे. तर दिवसभरात तब्बल 178 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनाबळींची संख्या 4 हजार 128 इतकी झाली आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल दिवसभरात 1 हजार 67 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 59 हजार 201 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 68 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 2 हजार 248 वर पोहोचली आहे.
भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे कोरोनाच्या आजारात निधन झाले, ते ७१ वर्षांचे होते. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले होते. त्यानंतर, त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली.
भारतीय जनता पार्टीचे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी खासदार व माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे आज निधन झाले. मी त्यांना भाजपा, महाराष्ट्रच्या वतीने विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 16, 2020
News English Summary: Incumbent BJP district president and former MP Haribhau Jawle died at the age of 71. He died while undergoing treatment for corona at Bombay Hospital in Mumbai. While in his native village in Jalgaon district, he was diagnosed with corona.
News English Title: BJP district president and former MP Haribhau Jawle died due to corona in Mumbai Bombay hospital News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो