22 December 2024 7:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

भाजपला निराशेने ग्रासले आहे | त्यांना शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही - जयंत पाटील

BJP, Shivsena, Minister Jayant Patil

मुंबई, ०३ फेब्रुवारी: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनपेक्षितपणे शिवसेनेच्या नैत्रुत्वात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आणि महाराष्ट्र सारखं मोठं राज्य भाजपने गमावलं. पण शिवसेना जर भाजपसोबत नसेल तर भाजपची सत्ता येणं शक्य नसल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे शिवसेनेवर तुटून पडणारे भाजपचे मध्येच शिवसेनेबाबत सौम्य भूमिका देखील घेताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यातील बहुचर्चित भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाष्य करण्यात आले आहे. भाजपला शिवसेनेशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळेच भविष्यात कधीतरी शिवसेना पुन्हा आपल्यासोबत येईल, अशी आशा भाजपच्या मनात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

आज (३ फेब्रुवारी) वर्ध्यात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप जाणुनबुजून स्वत:च्या सोयीची वातावरणनिर्मिती करून पाहत असल्याचा आरोप केला आहे. भाजपला निराशेने ग्रासले आहे. शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय त्यांना दिसत नाही. त्यामुळे स्वत:च्या मतदारसंघाच्या कामाचे कारण पुढे करून भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. या भेटीतून वेगळे अर्थ काढून चर्चा घडवून आणायची आणि त्या माध्यमातून होणाऱ्या राजकीय वातावरणनिर्मितीचा फायदा उठवायचा, हा भाजपचा डाव असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

 

News English Summary: The NCP has commented on the much-discussed meeting between Chief Minister Uddhav Thackeray and BJP leader Sudhir Mungantiwar. BJP has no choice but Shiv Sena. That is why BJP hopes that Shiv Sena will come with it again in future, said NCP state president Jayant Patil.

News English Title: BJP has no choice than Shiv Sena said minister Jayant Patil news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x