18 April 2025 4:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

त्यांनी आत्मचिंतन आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा असल्याचं सांगितलं: विनोद तावडे

BJP Leader pankaja Munde, Vinod Tawde, Ram Shinde

बीड : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे (Pankaja Munde on her Facebook Post). भारतीय जनता पक्षाचे नेते राम शिंदे आणि विनोद तावडे यांनी देखील आज पंकजा मुंडे यांची रॉयल स्टोन बंगल्यावर भेट घेतली. त्यामुळे पंकजा मुंडे आपल्या पुढील वाटचालीबद्दल नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यातच आज पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा असल्याचं सांगितलं.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या, भारतीय जनता पक्ष नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु, पंकजा मुंडे यांनी याविषयी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. दबावतंत्रासाठी मी फेसबुक पोस्ट केली नाही. मी पक्षाची सच्ची कार्यकर्ती आहे. बंडखोरी माझ्या रक्तात नाही. माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास करण्यात आला. चुकीच्या बातम्यामुळे मी व्यथित झाले. पक्षासी मी बांधील आहे. तसेच भारतीय जनता पक्ष सोडण्याबाबत अफवा पसरवण्यात आल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

सत्तेवरून पायउतार झालेल्या भारतीय जनता पक्षातील काही नेते बंडाचे हाती घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेतृत्वावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडूनही अनेकवेळा टीका झाली आहे. मात्र, सर्गीय. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर भाजपात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण विभागात आपल्याला निर्णयांचे फारसे स्वातंत्र्य नव्हते. विशेषत: महिला व बालकल्याण विभागातील कामे ही वरून ठरल्यानुसारच करावी लागायची ही त्यांची भावना असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. परळीमध्ये त्यांचे बंधू पण कट्टर प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे (NCP MLA Dhananjay Munde) यांना आपल्याच पक्षाच्या सरकारकडून बळ दिले जाते, निधी दिला जातो, अशी त्यांची भावना होती. त्यातच परळीमधील पराभव पंकजा यांच्या जिव्हारी लागला. त्यासाठी पक्षांतर्गतही दगाफटका झाल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)#Vinod Tawde(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या