15 January 2025 7:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
x

कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या मायभगिनी असुरक्षित, दिशा कायद्याचं काय झालं

BJP Leader Chitra Wagh, MahaVikas Aghadi, Disha Law

नवी मुंबई, १८ जुलै: मुंबईत कोरोनानं थैमान घातलं असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्यात आला होता. पनवेलमधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका क्वारंटाइन सेंटरमध्ये गुरुवारी रात्री हा मानवतेला काळिमा फासणारा प्रकार घडला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल तालुका पोलिस स्टेशनमध्ये विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शुभम राजेंद्र खातू (वय-25, न्यू पनवेल, भगतवाडी) असं आरोपीचं नाव आहे. आरोपी कालच क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल झाला होता. आरोपीची कोरोना टेस्ट घेण्यात आली असून आज संध्याकाळी त्याचा रिपोर्ट येणार आहे.

संबधित प्रकार गुरूवारी मध्यरात्री घडल्याचा खुलासा ANI’ने केला असून असून क्वारंटाईन सेंटमध्येच कोरोना संभाव्य म्हणून दाखल झालेल्या एका तरुणीचा एका विकृत तरुणाने विचित्र पद्धतीने विनयभंग केल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. पीडित महिला आणि मुलगा एकाच परिसरात राहत असून मुलाने तिचा विनयभंग करून तिच्या गुप्तांगाशी विकृत चाळे केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पोलिसांनी याबाबत तत्काळ कारवाई करत भा. दं. वि. कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधत महिलांसाठी असलेला दिशा कायदा ही केवळ घोषणाचं होती का? असा संतप्त सवाल केला आहे.

“पनवेल क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेवर झालेला बलात्कार हा करोनापेक्षाही भयानक आहे. यापूर्वीही अशा सेंटरमध्ये महिलांसोबत लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचे गुन्हे घडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या क्वारंटाइन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचतातचं कसे ? सुरक्षा यंत्रणा, प्रशासन काय करत असते ?,” असे सवाल चित्रा वाघ यांनी केले आहेत. “या घटनेतील आरोपीला अटक झाली आहे. पण त्यासोबत क्वांरटाइनसेंटरच्या सुरक्षेसाठी असलेले सुरक्षारक्षक, तिथले प्रशासनही तेव्हढेचं जबाबदार आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या भगिनीही सुरक्षित नाहीत. महिला सुरक्षेसाठीच्या ‘दिशा कायद्या’चं काय झालं की ती फक्त घोषणा होती,” अशी विचारणाही त्यांनी सरकारला केली आहे.

 

News English Summary: The rape of a woman at the Panvel Quarantine Center is worse than a corona. There have been cases of sexual harassment and molestation of women in such centers before. More importantly, how do male patients reach the women’s quarantine room?

News English Title: BJP Leader Chitra Wagh Criticize Cm Uddhav Thackeray Mahavikas Aghadi Government Panvel Quarantine Center Rape Case News latest Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x