22 January 2025 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

संदीप सिंह...मग या फोटोमधील लोकांना देखील केसमध्ये घ्या - निलेश राणे

BJP leader Nilesh Rane, Congress leader Sachin Sawant

मुंबई, ३० ऑगस्ट : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेला संदीप सिंह याच्या भाजपसोबत असलेल्या संबंधांची आणखी काही माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी रविवारी ट्विट करून यासंदर्भात भाजपवर नवे आरोप केले. संदीप सिंह याच्या तोट्यात असलेल्या कंपनीसोबत २०१९ साली विजय रुपाणी यांच्या गुजरात सरकारने १७७ कोटींचा सामंजस्य करार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रपट करण्यासाठी टोकन रक्कम म्हणून गुजरात सरकारने हे पैसे संदीप सिंहला दिले होते का, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी संदीप सिंहच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल सुरूच आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडून भाजपवर टीका करणाऱ्या ट्वीटचे सत्र सुरू आहे. आज देखील त्यांनी संदीप सिंहच्या मुद्द्यावरून गुजरात भाजपवर टिका केली आहे.

‘भाजपच्या मर्जीतील मुलगा संदीप सिंह यांच्या कंपनीचे आर्थिक व्यवहारात 2017 साली 66 लाखाचे नुकसान झाले होते, 2018 साली साली 61 लाखाचा नफा, तर पुन्हा 2019 मध्ये 4 लाखाचे नुकसान झाले होते. 219 मध्ये गुजरात सीएम रूपानी यांनी संदीप सिंहसह 177 कोटींचा करार केला. हा पैसा कुठून येत होता?’, असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.

दरम्यान, सचिन सावंत यांच्या या विधानावरुन आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, काँग्रेसचे नेते सचिन सावंत सांगत आहे की संदीप सिंग भाजपाच्या जवळ होता. पण त्यांना एवढं कळत नाही, मुंबई पोलीस ७० दिवस सीबीआय चौकशीची वाट बघत होती का? तसेच निलेश राणे यांनी एक फोटो शेअर केला असून त्या फोटमधील लोकांना देखील केसमध्ये घ्या, असं सांगितले. त्याचप्रमाणे सचिन सावंत तुम्ही नगरसेवक म्हणून फक्त एकदा निवडून या किंवा उभं राहायचं धाडस दाखवा, असं आव्हान देखील निलेश राणे यांनी दिलं आहे.

 

News English Summary: BJP leader Nilesh Rane has now criticized Sachin Sawant’s statement. Nilesh Rane tweeted that Congress leader Sachin Sawant was saying that Sandeep Singh was close to the BJP. But they don’t know much, was Mumbai police waiting for 70 days for CBI inquiry? Also Nilesh Rane shared a photo.

News English Title: BJP leader Nilesh Rane has criticized Congress leader Sachin Sawant News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x