राज्य जनतेने मोठं केलं आहे | कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही | निलेश राणेंचा राऊतांना टोला

मुंबई, १३ सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन बराच वादंग माजला. सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला. एवढंच नाही तर राजकीय वर्तुळातही कंगनावर टीका झाली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कंगनाविरोधात हक्कभंगही आणला गेला.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष सुरु आहे. मी मुंबई येतेय, कोणाच्या बापाची हिंमत असेल तर अडवून दाखवाव असं थेट चॅलेंज कंगनानं शिवसेनेला दिलं. त्यावर मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच आहे असं उत्तर शिवसेनेने दिलं. कंगनाच्या बेकायदेशीर कार्यालयावर हातोडा मारणे असेल किंवा कंगनानं मुंबईबद्दल केलेले विधान असेल या सर्व घडामोडीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मौन बाळगलं. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोक भाष्य केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असं मत त्यांनी मांडले आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी कंगना आणि शिवसेना वाद तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे कुटंबाच्या महत्त्वाबाबत सामनामधून लिहिलेल्या रोखठोक लेखाला निलेश राणे यांनी ट्वटिवरवरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, संजय राऊत म्हणतात की, पवार आणि ठाकरे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत. त्यांना सांगा जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते. म्हणजे महाराष्ट्र विकला असं म्हणायचं का? महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं. हे राज्य कुणाच्या बापाचं नाही. हे राज्य जनतेने मोठं केलं आहे. कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही.
संज्या म्हणतो पवार आणि ठाकरे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत. त्याला सांगा जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते म्हणजे महाराष्ट्र विकला असं म्हणायचय काय??? महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं, हे राज्य कोणाच्या बापाचे नाही. हे राज्य जनतेने मोठे केले कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 13, 2020
दरम्यान, निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून संजय राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊतांसारखा भंगार माणूस कुणी नाही. कारण परिस्थिती अंगावर आली हे लक्षात आलं की, फक्त मराठी अमराठी वाद लावून द्यायचा की लोग आपोआप स्वत:ला वाटून घेतात आणि शिवसेनेचं काम सोपं होतं. मराठी माणसाने आतातरी यांची चाल ओळखावी आणि संधी मिळताच यांना आडवं करावं.
संज्यासारखा भंगार माणूस कोणी नाही कारण परिस्थिती अंगावर आली हे लक्षात आलं की फक्त मराठी अमराठी वाद लावून द्यायचा की लोक आपोआप स्वतःला वाटून घेतात, शिवसेनेचं काम सोप्प होतं. मराठी माणसाने आता तरी यांची चाल ओळखावी आणि संधी मिळताच ह्यांना आडवं करावं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 13, 2020
News English Summary: In his tweet, Nilesh Rane said that Sanjay Raut says that Pawar and Thackeray are the brands of Maharashtra. Tell them the brand in the world is created to sell goods. So Maharashtra is sold? Maharashtra raised many people. This state does not belong to anyone’s father. This state has been made big by the people. Not by any selling brand.
News English Title: BJP Leader Nilesh Rane slams Shivsena MP Sanjay Raut over Thackeray Brand Saamana Newspaper Rokhthok editorial Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल