2 February 2025 10:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan EMI | वयाच्या 40 व्या वर्षी गृहकर्ज घेण्याचा प्लॅन करताय, मग, या 4 गोष्टी लक्षात ठेवा, कर्जाचा डोंगर हलका होईल Mutual Fund SIP | 50 लाखांचे घर खरेदी करताय, मग किती रुपयांची SIP करावी लागेल, मोठी रक्कम कशी मिळेल पहा SBI Salary Account | 'ही' सरकारी बँक सॅलरी अकाउंटवर देते अप्रतिम सुविधा, अनेकांना माहित नाहीत फायदे Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना ठाऊक नाही, काउंटरवरून खरेदी केलेले रेल्वे तिकीट ऑनलाईन कॅन्सल करता येईल Loan EMI Alert | कर्ज घेण्याचा विचार करताय, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, पुढे अडचणी वाढणार नाहीत PPF Scheme | PPF योजनेतून लखपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार, केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारं 68 लाखांचे रिटर्न Vivo Y58 5G | विवोच्या 50MP कॅमेरासह येणाऱ्या 'या' जबरदस्त स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, स्वस्तात मस्त स्मार्टफोन
x

खळबळ वगैरे काही नाही ही फक्त त्यांची वळवळ - निलेश राणे

BJP leader Nilesh Rane, Sharad Pawar, MP Sanjay Raut

मुंबई, ७ जुलै : शरद पवारांना यावं मातोश्रीवर लागलं अशी परिस्थिती नाही,अधूनमधून ते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. कोणत्याही प्रकारचे मतभेद सरकारमध्ये नाहीत. जशी बाहेर पावसाची रिपरिप सुरू आहे ना,तशी काही लोक बातम्यांची रिपरिप करत असतात. पवार साहेब भेटले पण इतर विषयांसाठी भेटले, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

देशातील व राज्यातील सद्यस्थितीच्या अनुषंगानं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. “ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल,” असा दावा संजय राऊत यांनी मुलाखतीविषयी केला आहे. देशातील व राज्यातील सद्य स्थितीवर भाष्य करणारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतली आहे. ही मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार असून, त्याविषयी संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार आणि संजय राऊतांच्या मुलाखतीवर निशाणा साधला आहे. निलेश राणे म्हणाले की, देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत. इतिहासामध्ये जाऊन काही गोष्टी आत्ता कळल्या तरी त्याचा कोणाला काय उपयोग? लोक चिडली आहेत, इंटरव्यूमध्ये इंटरेस्ट कोणाला नाही. तसेच खरं कौशल्य लढ्यामध्ये असतं बोलण्यामध्ये नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

 

News English Summary: BJP leader Nilesh Rane tweeted that he has targeted the interviews of Sharad Pawar and Sanjay Raut. Nilesh Rane said that the country is in crisis and his interviews are going on and People are angry.

News English Title: BJP leader Nilesh Rane tweeted criticizing the interview between Sharad Pawar and MP Sanjay Raut News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x