पडद्याआडून माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न | प्रवीण दरेकरांचा सरकारवर आरोप

मुंबई, १ ऑक्टोबर: मुंबई बॅंक तोटा प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता भाजप नेते आणि मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. सरकारचा अहंकार यात जागा झालाय. यामध्ये शासन देणेकरी असल्याचे दरेकर म्हणाले. काही कमी जास्त गोष्टी असतील ते सहकार खात सांगत असतं. सहा मुद्द्यांची तपासणी लावली आहे हे खर असल्याचं ते म्हणाले. अनेक मुद्दे घेऊन मी विरोधी पक्षनेता म्ह्णून समोर येतोय. प्रश्न मांडतोय म्हणून पडद्याआडून माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न आहे. मी घाबरत नाही असे दरेकर म्हणाले.
अकाऊंट एनपीएमध्ये गेली होती त्यामुळे तोटा होता मात्र आता सर्वांनी मेहनत घेऊन आता बँक नफ्यात आलीये.ज्यांच्या विश्वासावर बँक मोठी झाली त्यांच्यासाठी हे स्पष्टीकरण आहे. खरं म्हणजे ही रुटीन तपासणी असल्याच ते म्हणाले. साखर कारखान्यांना दिलेले कर्ज कॉर्पोरेट लोन आहे. या लोन मुळे बँकेचा फायदा झालाय, एखादं दुसरं लोन थकलं असलं तरी सिक्युरिटी घेतलेली आहे. CBS प्रणाली बँकेत आहे. त्यामुळे तपशीलवार माहिती दिली जाईल. तपासणी करा काही हरकत नसल्याचे ते म्हणाले.
सेल्फ डेव्हलपमेंट योजनेला मंजुरी मिळणार आहे. सहाही मुद्द्यांमध्ये आरोप करण्याचं काहीही तथ्य नाही. तपशीलवार माहिती दिली जाईल असे ते म्हणाले. संस्था उभी करणं आणि चालवणं अवघड असतं. या बँकेतून आम्ही शेतकरी हौसिंग सेक्टर ला आधार देण्याचा प्रयत्न केल्याचे दरेकर म्हणाले.
दरम्यान, या सर्व प्रकरणात मुंबई बँकेचे चौकशी करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. यापूर्वीही मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर आणि इतर संचालक मंडळाविरोधात भाजपचे विवेकानंद गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. खातेदारांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचाही आरोप करण्यात आला होता. तर नाबार्डनेही मुंबई बँकेच्या कर्ज वितरणात अनियमितता असल्याचा ठपका ठेवला होता.
डिसेंबर २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार बँकेचे अध्यक्ष आणि विद्यमान भाजप आमदार प्रविण दरेकर यांच्या मेव्हण्याच्या खात्यावर कर्जाचा बराचसा पैसा वळता झाल्याचा आरोप झाला होता.
अंधेरीला एका खासगी कुरियर कंपनीत कुरियर बॉय म्हणून नोकरी करणारे १५ जण दीड दोन वर्षांपासून अन्यायाविरोधात दाद मागत होते. या सर्वांनी मुंबै बँक अध्यक्ष प्रविण दरेकरांचा मेव्हणा महेश पालांडेंच्या मदतीने मुंबै बँकेच्या कांदिवली ठाकूर व्हिलेज शाखेतून कर्जप्रकरणे केली. पगार कमी असतानाही क्षमतेपेक्षा अधिक रकमेची म्हणजे प्रत्येकी ३ लाखांचे कर्ज दोन दिवसांत मंजूरही झाली होती. परंतु त्यांच्या खात्यावरचा पैसा दुसऱ्यांच्या भलत्याच्याच खात्यावर वळवला गेला. यामधील काही पैसा हा दरेकरांचा मेव्हणा महेश पालांडे आणि त्याच्या पत्नीच्या खात्यावरही वळवण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं.
News English Summary: After the state government ordered an inquiry into the Mumbai Bank loss case, now BJP leader and Mumbai Bank chairman Praveen Darekar has given an explanation. The ego of the government has awakened in this. Darekar said that the government is indebted in this. If there are more or less things, they will tell you to cooperate. He said it was true that six issues had been investigated.
News English Title: BJP leader Pravin Darekar reaction on Mumbai bank loss issue Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल