22 November 2024 1:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मुंबई महापालिका निवडणूक | भाजप पुड्या सोडेल पण मनसे पुन्हा तीच चूक करणार? - सविस्तर वृत्त

BJP leaders, Alliance with MNS, BMC Election, Pravin Darekar

मुंबई, १९ नोव्हेंबर: मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा भगवा फडकावण्याचा निर्धार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेला महापालिका निवडणुकीत मात देण्यासाठी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मनसे- भाजप युतीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेना – भाजप युती तुटल्यानंतर भाजपनं ही शिवसेनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा चंग भाजपनं बांधला आहे. महापालिका निवडणुकांसाठी भाजप मनसेसोबत युती करणार असल्याचं बोललं जातंय. प्रवीण दरेकर यांनीही मनसेबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. ‘आजतरी भाजपा स्वबळावर लढण्याची तयार करत आहे. पण, निवडणुकींच्या वेळी याबाबत निर्णय घेऊ,’ असं स्पष्ट संकेत दिले आहे.

दुसरीकडे मुंबईच्या भानगडीमध्ये भारतीय जनता पक्षाने पडू नये, मुंबई भारतीय जनता पक्षाकडे गेली तर ती गुजरातकडे नेली जाणार अशी टीका करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे. छत्रपतींचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा शिवसेनेला पेटंट दिलेला नाही. हा सगळ्यांचा भगवा आहे. त्याचं पावित्र्य राखण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतेय असा टोला दरेकरांनी राऊतांना लगावला आहे. दरेकर पुण्यामधील एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

दरम्यान, मागील इतिहास आणि भाजपने आज पर्यंत मित्रपक्षांना संपविण्याचा किंवा त्यांची राजकीय ताकद कमी करण्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. बिहार मधील मित्रपक्षावरील विश्वास हा केवळ महाराष्ट्रातील अनुभवातून आलेल शहाणपण आहे. त्यात राज्यात शिवसेनेनं केलेली महाविकास आघाडी ही मनसेला चालून आलेली मोठी राजकीय संधी आहे. भाजप जरी मनसेसोबत युती करण्याच्या अप्रत्यक्ष राजकीय पुड्या सोडत राहिले तरी उत्तर भारताचं महत्व जाणणारे आणि २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेला भाजप पक्ष मनसेसोबत थेट युती करण्याची शक्यता नाही. केलाच तर मराठी मतं फुटून शिवसेनेचं नुकसान व्हावं म्हणून निवडणुकीच्या निकालानंतर मनसेचा विचार केला जाईल अशा पुड्या सुटण्याची अधिक शक्यता आहे. मात्र मनसेने पूर्वी घेतलेल्या अनुभवातून ते स्वतःच भाजपसोबत न जाण्याचं जाहीर करण्याची अधिक शक्यता आहे. मात्र भाजपने पुन्हा निवडणूक पूर्व भेटी गाठींमध्ये मनसेला गुंतविल्यास त्याचा पुन्हा थेट भावनिक फायदा शिवसेनेला मिळेल आणि पूर्वी अनुभवलेले तेच अनुभव पुन्हा त्यांच्या वाट्याला येतील. त्यामुळे मनसेची भूमिका यावेळी सावध असेल अशीच अधिक शक्यता आहे.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis has expressed his decision to throw BJP’s saffron on Mumbai Municipal Corporation. Will Bharatiya Janata Party form an alliance with Maharashtra Navnirman Sena to defeat Shiv Sena in municipal elections? Such a question is currently present. BJP leader Praveen Darekar has given important hints about the MNS-BJP alliance.

News English Title: BJP leaders talking about alliance with MNS party during BMC Election news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x