26 December 2024 12:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

CAA: हा कायदा केंद्राचा आहे, तुझ्या बापाचे राज्य आहे का? शेलारांची उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दात टीका

BJP MLA Ashish Shelar, CM Uddhav Thackeray, CAA, NRC

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA) पाठिंबा दर्शवला आहे की विरोध हे प्रोमोमध्ये स्पष्ट झालेलं नाही. तर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (NRC) विरोध असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी आपली भुमिका मांडली.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळं देशातील कोणत्याही नागरिकाचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही. मात्र, महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही. एनआरसी लागू झाल्यास हिंदू आणि मुस्लीम अशा दोघांनाही नागरिकत्व सिद्ध करण्यात खूपच अडचणी येऊ शकतात. मी असं होऊ देणार नाही, असंही ठाकरे म्हणाले.

दरम्यान, त्यांच्या याच विधानावर भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली. “हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, असा घणाघात शेलारांनी केला. आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतच्या भूमिकेवरही टीका केली. “शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल”, असे टीकास्त्र शेलारांनी सोडलं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपाऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ‘भारतीय विद्यार्थी चळवळ दशा आणि दिशा’ या विषयावर बोलताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

तत्पूर्वी,‘नागरीकत्व सिद्धं करणं हा केवळ मुस्लिमांनाच नाही, तर हिंदूंनाही जड जाईल’ त्यामुळे तो कायदा मी महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा प्रोमो हा आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये CAA संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी CAA कायदा महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे CAA वरून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण होताना दिसतोय. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेल्या मुलाखतीचा तीसरा प्रोमो आज प्रसिद्ध करण्यात आला. या प्रोमोत CAA संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA कायदा महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं उत्तर दिलंय.

 

Web Title:  BJP MLA Ashish Shelar criticised CM Uddhav Thackeray over CAA implementation issue in Maharashtra.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x