14 January 2025 6:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा
x

मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड तर, त्यांच्या चिरंजीवांना पब-बारची जास्त चिंता आहे - आ. शेलार

BJP MLA Ashish Shelar, CM Uddhav Thackeray, Aaditya Thackeray

मुंबई, २१ नोव्हेंबर: राज्यात ‘अनलॉक’च्या प्राधान्यक्रमावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. ‘मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड तर, त्यांच्या चिरंजीवांना पब, बारची चिंता जास्त आहे,’ असा आरोप शेलार यांनी केला. विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्तानं शेलार पुण्यात आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका केली.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार शेलार म्हणाले की, “पब बार उघडण्यापूर्वी मंदिरं उघडण्याची मागणी चुकीची नाही. नियम घालून ते जर उघडलं जाऊ शकतं. तर मंदिरं नियम घालून का नाही मंदिरं उघडली गेली नाही. राज्यातील शाळा उघण्याच्या संदर्भात सरकारने आमच्याशी चर्चा करावी अशी आमची भूमिका आहे. चर्चा केल्यानंतर भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे हे आम्ही जाहीर करू. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनानं निर्णय घ्यावा हा राज्य सरकारचा निर्णय चांगला आहे. भारतीय जनता पक्षाशी आधी चर्चा करावी आणि मग शाळांच्या संदर्भात आंदोलन करायचं की नाही ते ठरवू. जर आमची सत्ता असती तर आम्ही सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला असता. मात्र हे सरकार असे काही करताना दिसत नाही,” असंही शेलार यावेळी म्हणाले.

 

News English Summary: BJP MLA Ashish Shelar today lashed out at the Thackeray government over the priority of ‘Unlock’ in the state. “While the chief minister is worried about Bollywood, his life is more about pubs and bars,” MLA Ashish Shelar alleged. MLA Ashish Shelar had come to Pune on the occasion of the elections for the graduate and teacher constituencies of the Legislative Council. In a press conference held at that time, he criticized the state government on various issues.

News English Title: BJP MLA Ashish Shelar criticize CM Uddhav Thackeray and Aditya Thackeray over Bar Pub Film City news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x