16 January 2025 2:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

कृष्णकुंज'वर भाजप नेत्यांच्या भेटीगाठी; भगव्या मनसे मोर्चाची चर्चा देशभर होणार

Raj Thackeray, BJP MLA Ashish Shelar

मुंबई : राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाची कास धरल्याने भारतीय जनता पक्षाला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते राज ठाकरेंना भेटत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरेंची भेट घेऊन काही दिवस लोटत नाही तोच आता आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतलीय. या वाढत्या भेटींमुळे ९ फेब्रुवारीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला भारतीय जनता पक्ष छुप्या पद्धतीने सहकार्य करणार असल्याची चर्चा सुरु झालीय.

आशिष शेलार बुधवारी सायंकाळी सात वाजता ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले. सुमारे तासभर शेलार राज यांच्या निवासस्थानी होते. यादरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत मोर्चा काढत आहे. हा मोर्चा एकप्रकारे नागरिकत्व कायद्याचे समर्थन करणाराच असून भारतीय जनता पक्षाचा अप्रत्यक्षपणे या मोर्चाला पाठिंबा राहणार आहे. त्याअनुशंगाने या दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. प्रसार माध्यमांना कोणतीही चुणूक लागू न देता भेट झाल्याचे समजते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वाटचाल सूरू केल्याने भारतीय जनता पक्षाशी जवळीक वाढल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. अधिवेशनापूर्वी आणि अधिवेशानंतर देखील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी वाढल्या आहेत. राज ठाकरे यांनी मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि विभाग अध्यक्षांची महत्वाची बैठक बोलावली होती. बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सर्वांच्या नजरेत धडकी भरवेल असा मोर्चा काढण्याच्या सूचना केल्याचं वृत्त आहे.

 

Web Title:  BJP MLA Ashish Shelar meet Raj Thackeray at Krushnakunj before 9 February Morcha.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x