19 April 2025 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
x

वटवृक्ष वाचवण्यासाठी पुढाकार आणि मुंबईत १२८२ झाडांची कत्तल करण्याचे प्रस्ताव मंजूर

BJP MLA Ashish Shelar, minister Aaditya Thackeray, Banyan tree

मुंबई, २८ जुलै : भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या आड येणारा सुमारे ४०० वर्षे पुरातन वटवृक्ष वाचविण्याबाबत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली होती. या पत्रास मान ठेवून महामार्गाचा नकाशा बदलला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

रत्नागिरी- नागपूर हायवे क्रमांक १६६ च्या नियोजित रस्त्यावर सांगलीजवळील भोसे गावात ४०० वर्ष जुनं वडाचं झाडं येत होतं. स्थानिकांनी रस्त्याला विरोध करत आंदोलन केलं. काही स्थानिकांनी आदित्य ठाकरेंना विनंती केली असता त्यांनी याची नोंद घेत गडकरींना पत्र लिहलं. त्यानंतर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि मार्गात बदल करण्याचे आदेश दिले होते.

दुसरीकडे ज्या शहरात आदित्य ठाकरे यांचं वास्तव्य आहे आणि ज्या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे तिथे मात्र वेगळीच स्थिती आहे आणि त्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी नेमकं बोट ठेवलं आहे. मुंबईतील ४०० वर्षे जुना एक वटवृक्ष वाचवून युवा नेत्यांनी केवढं कौतुक करुन घेतले, पण मुंबईत काय सुरु आहे? असा सवाल करत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे. “४०० वर्षे जुना एक वटवृक्ष वाचवून युवा नेत्यांनी केवढं कौतुक करुन घेतलं! पण मुंबईत काय सुरु आहे… ? लॉकडाऊन मध्ये १२८२ झाडांची कत्तल करण्याचे प्रस्ताव मंजूर झाले आता अजून ६३२ झाडे तोडणे किंवा प्रत्यारोपण करण्याचा प्रस्ताव तयार!! मुंबईत झाडांचा कत्तलखानाच सुरु आहे!”, असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.

 

News English Summary: How much did the young leaders appreciate by saving a 400 year old banyan tree, but what is going on in Mumbai? Ashish Shelar has targeted Aditya Thackeray by asking such a question. How much the young leaders appreciated the saving of a 400 year old banyan tree! But what is going on in Mumbai said Ashish Shelar.

News English Title: BJP MLA Ashish Shelar targets minister Aaditya Thackeray on appreciated saving a banyan tree News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या