24 November 2024 5:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळं महाराष्ट्राच्या जनतेचं दिवसाला पाच कोटीचं नुकसान - आ. भातखळकर

BJP MLA Atul Bhatkhalkar, CM Uddhav Thackeray, Metro car shed, Aarey Forest

मुंबई, ११ ऑक्टोबर : मेट्रो कारशेडच्या कामाला मागील नऊ महिन्यापासून स्थगिती दिल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचं दिवसाला पाच कोटी रूपयांचं नुकसान होत आहे. याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, याबाबत त्यांनी चर्चा करणं गरजेचे आहे. असं वक्तव्य कांदिवली पूर्वचे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केले. यात त्यांनी मेट्रो तीन प्रकल्पाच्या कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय जाहीर केला. मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड आता आरे काॅलनीऐवजी कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर बांधण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर आमदार भातखळकर यांनी टीका केली.

“मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी आहे. कारण ही जमीन कोर्टकज्जात अडकलेली आहे. मुंबईत कारशेडसाठी फक्त आरेची जमीन उपयुक्त असल्याचा तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल असताना ही उठाठेव कशाला?” असा सवाल त्यांनी केला आहे.

भातखळकर म्हणाले की, मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की, त्यांच्या सरकार नियुक्त समितीनेच मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड आरे काॅलनीच्या जागेवरच होऊ शकते असे म्हटले होते, त्याशिवाय आमच्या सरकारच्या काळात नियुक्त केलेल्या
समितीने देखील कारशेडसाठी आरे काॅलनीची निवड केली होती. असे भातखळकर म्हणाले.

 

News English Summary: The people of Maharashtra are losing Rs 5 crore a day due to the postponement of the Metro car shed for the last nine months. The Chief Minister is responsible for this, he needs to discuss this. This statement has been made by BJP MLA Atul Bhatkhalkar from Kandivali East.

News English Title: BJP MLA Atul Bhatkhalkar criticized CM Uddhav Thackeray over metro 3 project car shed decision Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x