जो न्याय अर्णव गोस्वामींना लावला | तोच न्याय अनिल परब यांना लावणार काय?

मुंबई, ९ नोव्हेंबर: दिवाळीचा सण तोंडावर असताना पगार थकल्यानं जळगावात एका एस.टी कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तत्पूर्वी माझ्या आत्महत्येला ST महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत या कंडक्टरनं टोकाचं पाऊलं टाकलं. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने (Jalgaon ST Conductor Manoj Anil Chaudhari ) सोमवारी (९ नोव्हेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे.
दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करणाऱ्या ठाकरे सरकारने इथेही तोच न्याय लावून चौधरी यांच्या मृत्यूला कारणीभूत मानून राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांना तात्काळ अटक करावी,’ अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे.
कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविरत काम करणाऱ्या ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा मागील ४ महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. एकीकडे मंत्र्यांच्या बंगल्यावर व गाड्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करायचा, अनावश्यक विषयांत वकिलांना कोट्यवधी रुपये फी द्यायची पण दुसरीकडे करोनाचे कारण पुढे करत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रोखून ठेवण्याचे पाप ठाकरे सरकार करत आहे. या विषयी वारंवार करण्यात आलेल्या मागणीकडे दुर्लक्ष करून एसटी कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचे महापाप ठाकरे सरकार करीत असल्याचा आरोप देखील अतुल भातखळकर यांनी केला आहे.
News English Summary: A shocking incident has taken place in Jalgaon where an ST employee committed suicide by choking himself due to salary fatigue while Diwali was on the horizon. Earlier, the conductor took extreme measures, alleging that the ST Corporation and the Thackeray government were responsible for my suicide. Manoj Anil Chaudhary, an ST conductor from Jalgaon, committed suicide by hanging himself on Monday (November 9). Chaudhary also wrote a suicide note before committing suicide.
News English Title: BJP MLA Atul Bhatkhalkar target Shivsena over suicide of a ST worker in Jalgaon news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, गडगडतेय शेअर प्राईस, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IREDA