ED Vs Shivsena | वैयक्तिक घरातली उणी धुनी बाहेर निघत असल्याने मोर्चा

मुंबई, ०३ जानेवारी: प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही सक्तवसूली संचलनालय अर्थात EDची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ED विरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची 5 जानेवारीला ED कडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 5 जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार असल्याची माहिती मिळतेय. गेल्या काही दिवसांत शिवसेना नेत्यांना ED कडून नोटीस बजावण्यात आल्यामुळे शिवसेनेनं आता ED विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांपाठोपाठ संजय राऊतांना ईडीची नोटीस आल्यानं शिवसेना आता आक्रमक झाली आहे. प्रताप सरनाईकांसह दोन्ही मुलांना तर संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवला होता. ईडीच्या रडारवर शिवसेना नेत्यांचा परिवार असल्याचं प्रथम दर्शनी जाणवत आहे आणि त्यामुळे शिवसेनेत संताप वाढत आहे.
दरम्यान, यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना आ. नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, ‘शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे…हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही ….हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही….हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही….पण वैयक्तिक घरातली उणी धुनी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा!….महाराष्ट्र धर्म?
शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे..
हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही ..
हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही..
हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही..
पण वैयक्तिक घरातली उणी धुनी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा!
महाराष्ट्र धर्म?— nitesh rane (@NiteshNRane) January 3, 2021
News English Summary: MP Sanjay Raut’s wife Varsha Raut will be questioned by the ED on January 5. There is a possibility of a show of strength from Shiv Sena. It is learned that Shiv Sainiks will arrive in Mumbai on January 5 by buses and private trains from Mumbai, Navi Mumbai, Thane, Mira Bhayander area. Shiv Sena leaders have been issued notices by the ED in the last few days and now the Shiv Sena has taken an aggressive stance against the ED. BJP MLA Nitesh Rane has lashed out at Shiv Sena.
News English Title: BJP MLA Nitesh Rane criticised Shivsena over Morcha against ED action news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA