23 February 2025 10:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

इस्पितळात बेड्स आहेत की नाही हे समजत नसल्याने कोरोना रुग्ण बाहेरच

MLA Nitesh Rane, Covid 19

मुंबई, १४ मे : कोरोनामुळे बुधवारी मुंबईत तब्बल ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी १७ मृत्यू हे ४ ते १० मे दरम्यानचे आहेत. २२ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील २४ रुग्ण पुरुष आणि १६ रुधारावीमध्ये कोरोनाची ६६ नवी प्रकरणे आढळून आली. येथील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार २८ एवढा झाला आहे. दादरमध्ये ८ नवी प्रकरणे आढळून आली. २१ कोरोनाबाधितांना सोडण्यात आले आहे. ग्ण महिला होत्या.

मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ३ जणांचे वय ४० वर्षाखाली होते. २० जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित १७ रुग्ण ते ४० ते ६० वर्षादरम्यानचे होते. सध्या मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत असल्याने मुंबई शहरातील पालिकेच्या इस्पितळांमध्ये गोंधळाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सरकार किंवा महापालिकेकडे अशी कोणतीही केंद्रीय यंत्रणा नाही जी कोरोनाबाधित झालेल्या लोकांना इस्पितळात किंवा कोरोना उपचार केंद्रात नेमके किती बेड्स शिल्लक आहेत याची माहिती देऊ शकेल.

परिणामी अनेक कोरोना बाधित रुग्ण इस्पितळाबाहेर आणि कोरोना उपचार केंद्राबाहेर १-२ दिवस ताटकळत उभे असतात, मात्र त्यांना कोणतीही माहिती दिली जातं नाही. त्यामुळे ते देखील सार्वजनिक ठिकाणी उभे राहिल्याने अजून गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात. यामध्ये सामान्य लोकांची किंवा कोरोना बाधितांची काहीच चूक नसून सरकारकडे त्यांना माहिती देणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने भीषण प्रकार घडत आहे.

तसाच प्रकार मुंबईतील चेंबूरस्थित एसआरव्ही इस्पितळाच्या बाहेर घडला आहे. संबंधित तरुण कोरोना बाधित झाल्याने स्वतःहून इस्पितळात दाखल होण्यास आला. त्याने अनेकदा पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना बेड्स मिळण्याबाबत विचारणा केली, मात्र त्याला एम वेस्ट वॉर्डमधील पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती दिली गेली नाही. परिणामी संबंधित तरुण असाच इस्पितळाच्या बाहेर ताटकळत उभा असल्याचं समोर आलं आहे. स्वतः भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी याबाबत ट्विट करून जाब विचारला आहे.

 

News English Summary: The same thing happened outside the SRV Hospital in Chembur, Mumbai. Concerned young Corona was hospitalized on her own after being infected. He often asked the concerned municipal officials about getting the beds, but he was not given any information by the municipal officials in M ​​West ward. As a result, it has come to light that the concerned youth is standing outside the hospital. BJP MLA Nitesh Rane himself has tweeted about this and asked for an answer.

News English Title: BJP MLA Nitesh Rane criticized BMC over covid 19 patients treatment News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x