22 December 2024 10:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मोहिमेला माझे कुटुंब, माझी जबाबदारी नाव योग्य | ते फक्त त्यांच्या कुटुंबाचीच जवाबदारी घेतात

BJP MLA Nitesh Rane, CM Uddhav Thackeray, Maharashtra government scheme, Marathi News ABP Maza

मुंबई, ८ सप्टेंबर : महाराष्ट्रातील जनतेच्या जनजागृतीसाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना दोन टप्प्यात राबवली जाणार आहे. प्रत्येक कुटुंबाची आरोग्य चौकशी केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. ही योजना दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. प्रत्येक कुटुंबाची आरोग्य चौकशी या योजने अंतर्गत केली जाणार आहे.

“मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला धन्यवाद देत आहे, कारण मी सुरुवातीलाच म्हटले होते की हे करोनाचे संकट म्हणजे विषाणू बरोबरचे आपले युद्ध आहे. या युद्धामध्ये सर्व धर्मीय, सर्व पक्षीय खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे मैदानात उतरले. मधल्या काळामध्ये आपण अधिवेशन कधी घ्यावे, या विषयावर चर्चा केली आणि दोन दिवस अधिवेशन घेण्याचे ठरले. दोन्ही दिवस अत्यंत शांतपणे, शिस्तीने, समजूतदारपणे, सामंजस्याने विरोधी पक्षाने आणि सर्व पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी शासनाला सहकार्य केले, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेला दिलेल्या नावावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. राज्य सरकारच्या या मोहिमेसंदर्भात ट्विट करताना आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, “मुख्यमंत्रींनी योग्य नाव दिले आहे…..कारण….ते स्वतःच कुटुंब सोडून कसलीच जबाबदारी घेत नाहीत!! …..लगे रहो !!!

 

News English Summary: BJP MLA Nitesh Rane has target Chief Minister Uddhav Thackeray for the name given to the campaign, My Family, My Responsibility. While tweeting about the state government’s campaign, BJP MLA Nitesh Rane said that the Chief Minister has given the right name. Because, they just take a responsibility of their own family only, stay tuned.

News English Title: BJP MLA Nitesh Rane criticized CM Uddhav Thackeray over Maharashtra government scheme Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x