19 April 2025 11:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY
x

नाईट लाईफ गॅंगला मोठं योगदान देणाऱ्या डिनो मोरियाला पद्म पुरस्कार मिळणार नाही अशी...

BJP MLA Nitesh Rane, environment minister Aaditya Thackeray, Chairman of Padma Awards committee

मुंबई, १२ ऑगस्ट : वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत 5 कॅबिनेट मंत्री, 2 राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा 9 जणांचा यात समावेश आहे.

यात उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी यांची ही या समितीत सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, याच विषयावरून विरोधकांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विटरवरून सणसणीत टोला लगावला आहे. याबद्दल ट्विट करताना आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, “आदित्य ठाकरे राज्य सरकारच्या पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष झाले आहेत. अपेक्षा करूया की आता लवकरच डिनो मोरियाला पद्म पुरस्कार मिळणार नाही. कारण त्याचं नाईट लाईफ गॅंगला मोठं योगदान आहे….Let’s wait n watch!!

 

News English Summary: A committee has been constituted to recommend for the Padma Awards the dignitaries who have excelled in various fields. Tourism, Environment and Etiquette Minister Aditya Thackeray has been appointed as the chairman of the committee.

News English Title: BJP MLA Nitesh Rane criticized environment minister Aaditya Thackeray after appointed as chairman of Padma Awards committee News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या