5 November 2024 10:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

आम्ही ऐकलंय की तो मंत्रालयातील फाइल्सवर ज्याप्रमाणे नियंत्रण ठेवतोय | त्यासाठी त्याला...

MLA Nitesh Rane, Varun Sardesai, Security

मुंबई, ११ जानेवारी: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा मुंबई पोलिसांनी अहवाल दिल्यानंतरसुद्धा ही त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांसोबतच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे.

महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेच्या युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनाही एक्स दर्जाची सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वरूण सरदेसाई हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचा मुलगा आहे. त्यांच्याकडे युवासेनेच्या सचिव पदाची जबाबदारी आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वरूण सरदेसाई यांचा वावर मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर कार्यरत असल्याचं पाहायला मिळालं आहे.

दरम्यान, याच विषयाला अनुसरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरून टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, “या सरदेसाई मुलाची सुरक्षा वाढविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय योग्य आहे! त्याला नक्कीच अतिरिक्त सुरक्षेची आवश्यकता आहे, कारण आम्ही ऐकलं आहे की मंत्रालयातील फाइल्सवर तो ज्याप्रमाणे नियंत्रण ठेवतो त्यामुळे नोकरशहा त्याच्यावर रागावला आहे आणि त्याला नक्कीच संरक्षणाची गरज आहे!…

 

News English Summary: BJP MLA Nitesh Rane has criticised Thackeray government over providing security to Varun Sardesai Twitter. In a tweet, Nitesh Rane said, “The decision of the Mahavikas Aghadi government to increase the security of this Sardesai boy is the right one! He definitely needs extra security, as we have heard that the bureaucrats are angry with him for controlling the files in the ministry Needed!

News English Title: BJP MLA Nitesh Rane has criticised Thackeray government over providing security to Varun Sardesai news updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x