16 April 2025 10:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही | पण त्यांच्या इन्स्टापोस्टवर ती लाईक करते

BJP MLA Nitesh Rane, Rhea Chakraborty, Minister Aaditya Thackeray, instagram post

मुंबई, २७ ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजूपत याच्या आत्महत्येनंतर देशभर वादळ निर्माण झालं. सुशांतच्या कुटुंबासह भाजपने या प्रकरणाच्या तपासाबाबत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. महाराष्ट्र सरकारमधील एका युवा मंत्र्यांच्या दबावामुळे सुशांत आत्महत्या प्रकरणात योग्य दिशेने तपास होत नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार निशाणा साधण्यात आला. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीची भेट झाली का, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता याप्रकरणी रिया चक्रवर्तीने खुलासा केला होता.

आदित्य ठाकरेंना मी कधीही भेटले नाही, असं रियानं निवेदनात म्हटलं. तिचे वकील सतीश माने शिंदेंनी हे निवेदन प्रसिद्ध केलं आहे. ‘आदित्य ठाकरे कोण आहेत हे रियाला माहीत नाही. ती त्यांना कधीही भेटलेली नाही. तिनं त्यांच्यासोबत फोनवरून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून कधीही संवाद साधलेला नाही,’ असं स्पष्टीकरण रियाच्या वतीनं माने शिंदेंनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात होतं.

मात्र त्या निवेदनांतर पुन्हा आदित्य ठाकरे चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण आदित्य ठाकरे यांना कधीच न भेटलेली, त्यांच्याशी कोणत्याही माध्यमातून संवाद न साधणारी आणि त्यांना ओळखत देखील नसणारी रिया त्यांच्या पोस्टला लाईक्स करते हे विशेष म्हणावं लागेल. याबाबत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलखोल केली आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे एक सवाल उपस्थित केला आहे. नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय, असा दावा त्यांनी केला आहे.

 

News English Summary: However, against this backdrop, BJP leader Nitesh Rane has raised a question on Twitter. MLA Nitesh Rane tweeted that Rhea Chakraborty doesn’t know who Aditya T is, but claimed that she liked his Instagram post.

News English Title: BJP MLA Nitesh Rane has raised a question on Twitter over reaction of Rhea Chakraborty on minister Aaditya Thackeray instagram post News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या