22 February 2025 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात
x

IPL सट्टेबाजार, खंडणी आणि सचिन वाझे | नितेश राणेंचे वरुण सरदेसाईंवर गंभीर आरोप

BJP MLA Nitesh Rane, Sachin Vaze, Varun Sardesai

मुंबई, १५ मार्च: नितेश राणे यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला. देशात चांगल्या हेतूने आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. त्यातून नवोदित क्रिकेटपटूंनाही वाव मिळत आहे. मात्र, या आयपीएलवरही सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजांना तुमचं लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला माहीत आहे. तुमच्यावर छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून या सट्टेबाजांना दिली जात होती, असा दावा भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

तसंच सचिन वाझे यांनी सट्टेबाजांना पैशासाठी फोन केल्यानंतर वाझेंना एका माणसाचा फोन जातो. तुम्ही सट्टेबाजांकडून एवढे पैसे मागितले. आमचं काय? आम्हाला त्यातला हिस्सा का नाही?, अशी विचारणा या माणसाकडून वाझेंना केली जाते. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून वरुण सरदेसाई आहेत.

वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यातील संभाषणाची माहिती एनआयएने घ्यावी. वरुण सरदेसाई कुणाचा नातेवाईक आहे याची माहिती एनआयएने घ्यावी. तसेच हे फोन कुणाच्या सांगण्यावरून हे फोन केले गेले. कुणी त्याला फोन करायला सांगितले, याची माहिती समोर आली पाहिजे. वाझेचे सीडीआर रिपोर्ट, व्हॉट्सअॅप कॉलचे रिपोर्ट असतील. वाझे आणि सरदेसाईमधील संभाषण तपासले पाहिजे. वाझेचं संभाषण तपासणं जमत नसेल तर वरुण सरदेसाईंचं संभाषण तपासा. या महिन्यात त्यांचं बोलणं झालं होतं का याची माहिती घ्या, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

सरदेसाई कुणाचा नातेवाईक आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने हे फोन केला जात होता हे सांगण्याची गरज नाही, असं देखील ते म्हणाले. सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या निमित्ताने सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. सचिन वाझे आणि वरुण सरदेसाईंची काय लिंक आहे त्याचाही तपास करण्यात यावा, सर्वच बाहेर येईल, असंही ते म्हणाले.

जगातील सर्वात मोठ्या श्रीमंत माणसाच्या घराबाहेर स्कॉर्पिओ ठेवली जाते. त्यात जिलेटिनच्या कांड्या असतात. यात वाझेंचा हात असल्याचं बोललं जातं. त्यामुळे हा सर्व प्रकार एकटा माणूस करू शकत नाही. यामागचा बोलविता धनी कोण आहे? याचीही चौकशी करण्यात यावी. जोपर्यंत ही चौकशी होत नाही, तोपर्यंत वाझेचा मास्टरमाइंड कोण आहे, त्याचा मायबाप कोण? आणि गॉडफादर कोण हे सुद्धा बाहेर येईल, असंही ते म्हणाले.

 

News English Summary: After Sachin Vaze calls IPL bookies for money, Vaze gets a call from a man. You demanded so much money from bookies. What about us Why don’t we have a share in it ?, this man asks Vaze. This man is none other than Varun Sardesai.

News English Title: BJP MLA Nitesh Rane made serious allegations on relation between Sachin Vaze and Varun Sardesai news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x