15 January 2025 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

भावाचे ७ नगरसेवक फोडणाऱ्याला या ५ जणांना परत घेताना लाज वाटेल का?

BJP MLA Nitesh Rane,  Shivsena, Parner corporators, NCP

नगर, ८ जुलै : तीन दिवसांपूर्वी चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि महाविकास आघाडीत भूकंप झाला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले होतं. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला होता.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी (४ जुलै) राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला. त्यामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बसला. महाविकास आघडीतील समन्वयावरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोन केला. अजित पवारांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा प्रवेश झाल्यानं ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. आमचे नगरसेवक परत पाठवा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक आता माघारी परतणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्या भेटीत नगरसेवकांच्या घरवापसीचा निर्णय झाला.

शिवसेनेनं ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबई महापालिकेतील मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक फोडले होते. महापालिकेतील सत्ता स्थिर राखण्यासाठी शिवसेनेनं ही खेळी केली होती. मनसेवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचं त्यावेळी शिवसेना नेत्यांनी म्हटलं होतं. मनसेचे नगरसेवक फोडल्यानं शिवसेनेचं महापालिकेतलं संख्याबळ वाढलं. शिवसेनेच्या या खेळीमुळे मनसेला जोरदार धक्का बसला. आता काहीशी तशीच परिस्थिती शिवसेनेवर पारनेरमध्ये ओढवली आहे. अजित पवार यांच्या खेळीमुळे शिवसेनेला हादरा बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेचा संदर्भ देत मनसेनं शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

मात्र त्याचीच आठवण करून देत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे. त्यावर ट्विट करताना नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, “आपल्याच भावाचे 7 नगरसेवक फोडणाऱ्यांना या 5 जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का?…जे ऐका भावाला नाही जमल ते अजित दादांनी शब्दासाठी “करून दाखवले” !!….जय महाराष्ट्र!!

 

News English Summary: BJP MLA Nitesh Rane has paid attention to Chief Minister Uddhav Thackeray. While tweeting about it, Nitesh Rane has said that those who blew up his own brother’s 7 corporators will be ashamed to take back these 5 people?

News English Title: BJP MLA Nitesh Rane slams Shivsena over Parner corporators issue News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x