26 April 2025 12:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल PPF Investment | 90% लोकांना माहित नाही, मॅच्युरिटीनंतरही दर वर्षी 700000 रुपये व्याज मिळतं, पैसे बचतीचीही गरज नसते EPF for Home Loan | पगारदारांनो, गृहकर्ज डोईजड झालंय? EPF च्या माध्यमातून कर्जमुक्त होऊ शकता, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 26 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या BHEL Share Price | पीएसयू शेअर 4.21 टक्क्यांनी घसरला, बाजारातील पडझडीत तज्ज्ञांनी दिला असा सल्ला - NSE: BHEL Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 26 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मुख्यमंत्र्यांचे व दिल्लीश्वरांचे लाडके 'लाड' यांनी राज ठाकरेंची भेट घेतली; मूळ कारण गुलदस्त्यात

Raj Thackeray, MNS, Maharashtra Navnirman Sena, MLA Prasad Lad

मुंबई : सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून भारतीय जनता पक्ष महाजानदेश यात्रेत तर शिवसेना जन आशीर्वाद यात्रेला लागले आहेत. सांगली-कोल्हापूरमधील वातावरण सध्या हळूहळू पूर्वपदावर येऊ लागण्याने राजकीय चक्र फिरण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ या वाक्याने भाजपचा घाम काढणारे राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकं काय करणार ते अजून सत्ताधाऱ्यांना माहित नाही.

त्यात कृष्णकुंजवर घिरट्या मारणारे आशिष शेलार आणि विनोद तावडे यांची लोकसभा निवडणुकीनंतरची एकूण देहबोली जणू दिल्लीश्वरांनी राज ठाकरे यांच्याशी संवादावरून तंबीच दिली आहे का अशी शंका निर्माण झाली होती. कारण एका जाहीर कार्यक्रमात एकत्र येणारे राज ठाकरे आणि आशिष शेलार यांनी एकमेकांकडे कटाक्ष देखील टाकला नव्हता हे केमेऱ्यात टिपलं गेलं होतं. त्यामुळे सध्या राज ठाकरे यांना सामोरं जाणार तरी कोण अशी भाजपमध्ये अवस्था निर्माण झाली होती.

सध्या ईव्हीएम’वरून विरोधी पक्ष आंदोलन छेडणार असून त्यात राज ठाकरे यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. कारण सध्या या विषयाला अनुसरून शक्तिप्रदर्शन करणारी फौज सध्या त्याच्याकडेच आहे. त्यात आर्टिकल ३७० नंतर भाजपमधील दिल्लीश्वर विधानसभा निवडणुकीत आयत्यावेळी कोणतीही भूमिका जाहीर करू शकतात आणि त्यामुळेच शिवसेना देखील सतर्क राहून पक्ष विस्तारावर केंद्रित झाली आहे. शिवसेनेच्या मतदाराचा विचार आणि मनसेच्या मराठी मतदाराचा विचार एकसमान आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेच विरोधकांच्या भूमिकेत केंद्रस्थानी राहतील असं सध्याच चित्र आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांना हलक्याने घेईल अशी शक्यता कमी आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र स्वतः राज ठाकरे यांना त्याने काहीही फरक पडणार नाही उलट तेच मोठे होतील हे उमगलं असणार.

सध्या मनसेचा एकही आमदार -खासदार नसला तरी राज ठाकरे यापुढे देखील भाजपाचा घाम काढतील आणि याची पूर्ण कल्पना मोदी-शहा जोडीला असणार यात शंका नाही. आजच्या घडीला राज ठाकरे यांना भविष्यातील योजना पूणात्वात नेण्यासाठी शांत केलं तर भाजपाला मुद्देसूद विरोध आणि प्रतिउत्तर देणारा करणारा पक्ष किंवा नेता देशभरात नसेल याची मोदी-शहांना कल्पना असणार. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या फोडाफोडीत महत्वाची भूमिका बजावणारे आमदार प्रसाद लाड केवळ मुख्यमंत्र्यांचे नव्हे तर मोदी-शहांचे देखील खास झाले आहेत. त्यामुळे आशिष शेलार आणि विनोद तावडे यांना बाजूला करून प्रसाद लाड यांना पक्षाने कामाला लावल्याचे बोलले जात आहे. मित्र असल्याने फोनवर बोलणं शक्य होतं, मात्र प्रसाद लाड केवळ चहा आणि गप्पा मारण्यासाठी कृष्णकुंज’वर गेले होते असं म्हणणं हास्यास्पद ठरू शकतं. त्यामुळे नक्कीच काहीतरी घटना पुढे घडतील अशी शक्यता राजकीय विश्लेषक करत आहेत.

राजकीय विश्लेषकांनी तर्कवितर्क लावले असले तरी, प्रसाद लाड यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. लाड म्हणाले, आपले आणि राज ठाकरे यांचे पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत. वारंवार आमच्या भेटी होत असतात. त्यात राजकारण नाही, असे लाड यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना म्हणाले, राज ठाकरे हे गेल्या ५ वर्षांपासून भाजपवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करताहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. तर ही भेट राजकीय नसल्याचं स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी दिलंय. दरम्यान, प्रसाद लाड आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं वृत्त ANI या वृत्त संस्थेने दिलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला गळती लागली आहे. पक्षांतरामुळे पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(55)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या