22 January 2025 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई
x

केवळ सत्तेसाठी उद्धव ठाकरे हिंदुत्वाला विसरले: आ. प्रसाद लाड

BJP MLA Prasada Lad, Shivsena, Hindutva issue

मुंबई : राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापसून शिवसेना – भारतीय जनता पक्षामधील यांच्यातील वाद अधिकच विकोपाला गेला आहे. तर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर विविध मुद्यावरून टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेला पक्षप्रमुख आणि मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्ववादाच्या मुद्यावरून निशाणा साधला आहे.

यावेळी पुढे बोलताना आमदार प्रसाद लाड म्हणाले की, स्वर्गीय प्रभोधनकार ठाकरे व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा इतिहास सांगण्याची हिच ती वेळ आहे. तर “गर्व से काहो हम हिंदू हैं”, असे म्हणत त्यांनी हिंदुत्ववादाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

महाराष्ट्रात शिवसेनेने अगदी विरोधी विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्यापासून शिवसेनेला खुल्या मनाने हिंदुत्वावर बोलणं अवघड झालं आहे. हिंदुत्व विषयावर जोर देऊन बोलल्यास काँग्रेस – राष्ट्रवादी नाराज होतील या विचाराने शिवसेना नेत्यांना एखाद्या विशिष्ट विषयावर बोलताना देखील अडचणी येत आहेत. त्याचाच धागा पकडून भारतीय जनता पक्षाचे नेते शिवसेनेला वारंवार कोंडीत पकडत असल्याचं दिसत आहे.

 

Web Title:  BJP MLA Prasada Lad criticized Shivsena over Hindutva issue.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x