5 November 2024 7:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

कोरोनाला धर्म, उत्सव, सण समजत नाही | पण राम कदमांकडून पुन्हा धार्मिक ट्विट

BJP MLA Ram Kadam, Corona crisis, Hindu religion

मुंबई, २८ मार्च: कोरोनाचा संसर्ग देशभरात वाढत आहे आणि राज्यात त्याची सर्वाधिक झळ लागत असल्याचं पाहायला मिळतंय. पहिल्या लाटेपासून ते आता दुसऱ्या लाटेपर्यंत लाखो लोकांनी स्वतःचे प्राण गमावले आहेत. विशेष म्हणजे देशात मंत्री, खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी देखील कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. राज्यात देखील सत्ताधारी नेत्यांपासून विरोधकांमधील वरिष्ठ नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

पुन्हा शेकडो लोकं मृत्युमुखी पडण्यास सुरुवात झाल्याने काही स्मशान भूमीत अंत्यविधी करण्यासाठी देखील वेटिंग राहावं लागत आहे हे देखील समोर आलं आहे. कोरोनाचा जाती धर्माशी कोणताही संबंध नसताना त्याच्या कचाट्यात कोणीही येऊ शकतो हे वैज्ञानिक तज्ज्ञांनी स्पष्ट केलेलं असताना देखील काही राजकीय नेते याचा संबंध थेट धर्माशी जोडत असल्याचं पाहायला मिळतंय.

दुसऱ्या लाटेमुळे यंदाही अन्य सणांप्रमाणे होळी आणि धुलीवंदनाच्या सणावर कोरोनाचे सावट आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने राज्य सरकारकडून काही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून आजचा (२८मार्च) होळी आणि धूलिवंदनाचा (२९ मार्च) सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देतानाच खबरदारीचे आवाहनही केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला उद्देशून म्हणतात की, ‘परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना “या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया” असे आवाहन करत राज्यातील जनतेला होळी, धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

मात्र भाजपचे आमदार राम कदम यांनी रविवारी ट्विट करत राज्य सरकारवर चांगलीच आगपाखड केली. धुलिवंदनाच्यावेळी गर्दी होते, एकमेकांना रंग लावताना स्पर्श होतो. त्यामुळे धुलिवंदनावर घालण्यात आलेले निर्बंध मी समजू शकतो. पण होळी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे घराबाहेर पेटवू शकत नाही, असे ठाकरे सरकार म्हणते. मग आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? ठाकरे सरकारची अक्कल कुठे गेली आहे, असा सवालही राम कदम यांनी विचारला.

 

News English Summary: BJP MLA Ram Kadam tweeted on Sunday that the state government was on fire. There is a crowd during Dhulivandana, touching each other while colouring. So I can understand the restrictions imposed on Dhulivandana. But the Holi government says Holi cannot be lit in public places outside the house. So should we light Holi at home? Ram Kadam also asked where the wisdom of Thackeray government has gone.

News English Title: BJP MLA Ram Kadam connect corona crisis restrictions with Hindu religion news updates.

हॅशटॅग्स

#RamKadam(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x