1 January 2025 4:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | नोकरी असो किंवा व्यवसाय महिन्याला पेन्शन हवी असेल तर, 'हा' मार्ग ठरेल फायद्याचा NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉकला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, 33% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबद्दल खुशखबर आली, मल्टिबॅगर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: SUZLON
x

कोरोनाचं सावट...राम कदम यांचा दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय

BJP MLA Ram Kadam, Dahihandi festival

मुंबई, १९ जून : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी करणं टाळलं जात आहे. गणेशोत्सवापाठोपाठ आता दहीहंडीवर देखील कोरोनाचं सावट आलं आहे. भाजप नेता राम कदम यांनी यंदा दहीहंडी उत्सव रद्द केला आहे. कोरोनाचं संकट पाहता दहीहंडीला हजारो लोकांची गर्दी जमा होणार आहे. हे टाळण्यासाठी यंदा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

राम कदम यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. घाटकोपर परिसरात अतिशय मोठ्या प्रमाणात राम कदम दहीहंडी उत्सवाच आयोजन करतात. यावेळी हजारोंच्या संख्येत गोविंदा आणि सामान्य लोकं उपस्थित असतात. यामुळे जनहिताचा विचार करून दहीहंडीचं आयोजन न करण्याचा राम कदम यांनी निर्णय घेतला आहे. मुंबईत दहीहंडी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवासाठी गोविंदा पथक खूप मेहनत घेतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच या पुरात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर राम कदम यांनीदेखील दहीहंडीचा उत्सव रद्द करून त्यासाठी खर्च करण्यात येणारी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला होता. तसंच त्यांनी इतर दहीहंडी आयोजकांनाही सोहळा रद्द करण्याचं आवाहन केलं होतं. तसंच दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा करत संपूर्ण निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे आवाहनही केलं होतं.

 

News English Summary: After the Ganeshotsav on the backdrop of the corona, now the corona has also appeared on the curd. BJP leader Ram Kadam has canceled the Dahihandi festival this year. Thousands of people will gather at Dahihandi to witness the crisis of Corona. To avoid this, it has been decided to cancel the Dahihandi festival this year.

News English Title: BJP MLA Ram Kadam has canceled the Dahihandi festival this year because of corona virus News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x