16 January 2025 1:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

विधानसभेत मतदारसंघाचे प्रश्न न विचारण्याचे विक्रम रचणाऱ्या आ. कदमांचे राष्ट्रवादीला तारांकित प्रश्न

BJP MLA Ram Kadam, NCP MLA Nawar Malik

मुंबई: भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते नवाब मलिक यांना सभागृहाची नियमावली आणि कायदे समजून न घेताच तारांकित ट्विटचे प्रश्न करत आरोप केले आहेत. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक महाराष्ट्राची दिशाफ़ुल करत आहेत. विधानसभेचे नियम जगजाहिर आहेत. आमदारना तारांकित प्रश्न विचारण्यापासून रोखले. ही सरकारची नियोजन शून्यता. आणि BAC तारांकित प्रश्नांपासून आमदारना रोखण्यासाठी नव्हती. मात्र त्यावर सभागृहाचे नियम सांगून आ. राम कदम तोंडघशी पडले आहेत आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जे स्वीकारलं आहे त्यावर आ. राम कदमांनी हरकत घेतल्याचे समोर आलं आहे.

विशेष म्हणजे मागील भाजपच्या सत्ताकाळात प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये घाटकोपरचे पश्चिमेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी मागील ५ वर्षांच्या कालावधीमध्ये स्वत:च्या मतदारसंघासंदर्भात एकही प्रश्न विचारलेला नसल्याचे समोर आलं होतं. विधानसभेतील हजेरीच्या बाबतीतही राम कदम यांना क्रमांक ३२ वा होता. घाटकोपर पश्चिमेला केवळ निरनिराळे स्टंट आणि भेट वस्तूंचे आमिष दाखवून ते मतदारांना भुलवून ठेवतात आणि मतदारसंघाचे मूळ प्रश्न अधांतरीतच राहतात हे देखील अनेकदा समोर आलं होतं.

दुसरीकडे मागील सत्ताकाळात भाजपापेक्षा काँग्रेसच्या आमदारांची कामगिरी चांगली असल्याचे दिसून आलं होतं. प्रजा फाउंडेशनने गुरुवारी आमदारांच्या कामगिरीचा आढवा घेणारा २०१८-१९ या वर्षातील अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये मागील वर्षापेक्षा या वर्षी आमदारांनी समाधानकारक कामगिरी केल्याचे दिसून आले होते.

मागील वर्षी देखील प्रजा फाउंडेशन’कडून लोकप्रनिधींच्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्यात आलं होत, तसेच लोकप्रनिधींच ते रिपोर्ट कार्ड सामान्य जनतेसाठी खुलं करण्यात आलं होतं. त्यात भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांचा सुद्धा क्रमांक आला होता. परंतु तो क्रमांक खालून पहिला होता. त्याचाच धागा पकडून मनसेने घाटकोपर पश्चिमेला आमदार राम कदम यांच अभिनंदन करणारा पोश्टर लावला होता.

आमदार राम कदम यांचा लोकप्रनिधी या नात्याने केवळ क्रमांक खालून पहिला आला नसून, तर २०१७ च्या तुलनेत त्यांची कामगिरी या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये अजूनच ढासळली झाल्याचं अहवालात स्पष्ट झालं होतं. प्रजा फाउंडेशनच्या रिपोर्ट नुसार भाजप आमदार राम कदम यांची २०१७ मध्ये गुणसंख्या होती ४१.९६ टक्के म्हणजे ५० टक्के सुद्धा नव्हती. परंतु असे असताना सुद्धा ती गुणसंख्या २०१८ या वर्षासाठी अजून खालावाली होती ती केवळ ३३.३७ टक्के इतकी झाली होती. यावरून ते त्यांच्या मतदार संघात जितका देखावा करतात त्यापेक्षा हा रिपोर्ट काही वेगळंच निर्देशित करत होतं.

त्यामुळेच घाटकोपर मधील मतदाराला आमदार राम कदमांबद्दलचे वास्तव निदर्शनास आणून देण्यासाठी घाटकोपर पश्चिम मनसेचे विभागाध्यक्ष गणेश चुक्कल यांनी एक उपहासात्मक पोश्टर लावलं होता, ज्याची चर्चा घाटकोपरमध्ये रंगली होती. त्या पोश्टर’वर असा मजकूर लिहिण्यात आला आहे की,’पप्पू कान्ट डान्स साला ! गोविंदा आला रे आला ! पप्पू पुन्हा नापास झाला……जगातल्या सर्वात मोठ्या नकली भंपक गोष्टी करणारे, नको ती स्वयंम घोषित विशेषण लावणारे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी सर्व सामान्य जनतेच्या समस्यांसाठी झटणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कामगिरीच्या सर्वेक्षण करणाऱ्या प्रजा फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात पुन्हा वर्षीही खालून प्रथम क्रमांक पटकवला या बद्दल त्यांचे अभिनंदन….प्रजा फाउंडेशनने केलेल्या प्रामाणिक आणि खऱ्या सर्वेक्षणाबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन !! असा मजकूर टाकून आमदार राम कदम यांची खिल्ली उडविली होती.

 

Web Title:  BJP MLA Ram Kadam Questions to NCP MLA Nawab Malik Over Winter Session

हॅशटॅग्स

#RamKadam(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x