23 January 2025 10:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

फडणवीस पुन्हा यावेत म्हणून पुण्यवान आ. कदमांनी केदारनाथला प्रार्थना केली होती; आता भाजपचा महापौर?

BJP MLA Ram Kadam, BJP Mumbai Mayor

मुंबई: विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर आली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकांवर लक्ष्य केंद्रीत करत आढावा बैठका घेण्यास सुरवात केली आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानं भारतीय जनता पक्षाचा तिळपापड झाला आहे. भारतीय जनता पक्ष शिवसेनेला जमेल तिथं आव्हान देण्याची शक्यता आहे. अनेक वर्षे मुंबई शिवसनेच्या हातात असल्यानं तिथं धक्का देण्याचा भारतीय जनता पक्षाचा इरादा असल्याचं दिसत आहे.

मुंबईत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीनंतर मुंबईतील वसंत स्मृती येथे पत्रकार परिषद घेत बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती दिली. राज्यातील पक्षसंघटना आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत.

सध्या आम्ही मुंबईवर लक्ष केंद्रीत केले आहे. सन २०२२ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणे हे भारतीय जनता पक्षाचे एकमात्र उद्दिष्ट आहे. त्यामुळे मुंबईच्या बाबतीत लहानसहान गोष्टींचा विचार आम्ही करीत आहोत. येत्या १५ डिसेंबरपर्यंत वॉर्ड अध्यक्ष, २० डिसेंबरपर्यंत विधानसभा क्षेत्र, २५ डिसेंबरपर्यंत जिल्हाध्यक्ष आणि ३० डिसेंबरपर्यंत मुंबई भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांची निवड होईल’, अशी माहिती पाटील यांनी दिली. ‘मुंबईचा नवा अध्यक्ष घोषित करताना केंद्रातील एखादा नेता उपस्थित असणार आहे’, असे ते म्हणाले. या बैठकीला विनोद तावडे, आशीष शेलार आणि राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश आदी उपस्थित होते.

भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत वाद सुरु असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे. येणारा मुंबईचा महापौर हा भाजपचाच असणार, असा दावा भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केला. “मुंबईचा पुढचा महापौर भारतीय जनता पक्षाचा असणार, त्या दृष्टीने आमची मजबूत तयारी सुरु आहे. गेल्यावेळी आम्ही एक ते दोन जागांवर कमी पडलो होतो. पण आता मुंबईचा महापौर भारतीय जनता पक्षाचा असेल”, असं आमदार राम कदम म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस सपत्नीक केदारनाथच्या दर्शनासाठी गेले होते, त्यावेळी फडणवीसांचे कलियुगातील हनुमान देखील त्यांच्यासोबत उत्तरांचलला केदारनाथाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते आणि फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना केली होती आणि त्यानंतर फडणवीसांच्या राजकीय नशिबाला उलटी कलाटणी मिळाल्याचं पाहायला मिळालं. आता राम कदम यांनी मुंबईत भाजपचा महापौर बसवून शिवसेनेला सत्तेबाहेर ढकलण्याचा चंग बांधला आहे असं दिसतं.

 

BJP MLA Ram Kadam says Next Mumbai Mayor will from Bharatiya Janata Party

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)#RamKadam(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x