22 November 2024 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

पोरी पळवण्याचं भाष्य करणारे राम कदम शिवप्रेमी? कदमांकडून राऊतांची पोलिसात तक्रार

BJP MLA Ram Kadam, Shivsena MP Ram Kadam

मुंबई: उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका करताना ‘शिव’ शब्द काढून ठाकरेसेना असे नाव करावे, असे म्हटले होते. यावर राऊत म्हणाले होते की, उदयनराजे काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. शिवाजी महाराज हे युगपुरुष होते आणि आम्ही त्यांना दैवत मानतो. गणपती, विष्णूची पूजा करताना वंशज असावे लागत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी छत्रपतींचे वंशज म्हणविणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असं आव्हानच केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदरच करतो. महाराजांचे नाव जिथे येते, तिथे आम्ही नतमस्तकच होतो. पण शिवाजी महाराज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणविणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले होते.

त्यानंतर संजय राऊत यांच्या विरोधात उदयनराजे समर्थक आक्रमक झाले आहेत. शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ साताऱ्यातील पोवई नाका परिसरात निदर्शने करण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे राजवाडा येथे गांधी मैदानावर उदयनराजे समर्थक मोठ्या प्रमाणात जमणार आहेत. यानंतर साताऱ्यातून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. “छत्रपती शिवरायांच्या वंशजांकडे पुरावा मागणारे शिवरायांचे नाव घेऊन शिवसेना महाराष्ट्रात वाढली त्या शिवसेनेच्या संजय राऊतांनी ही मागणी केली आहे. हे अत्यंत दूर्देवी आहे. संजय राऊतांनी त्यांचे विधान बिनशर्त माफी मागत स्वत:चे विधान मागे घ्यावे. राऊतांच्या या वक्तव्यामुळे मी आणि माझ्यासारख्या अनेकांनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. घाटकोपर पोलीस स्थानकामध्ये संजय राऊतांविरोधात तक्रार नोंदवणार आहे. सर्व शिवप्रेमींनी आवश्यक यावे,” असं कदम प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

महिलांचा जाहीरपणे अपमान करणाऱ्या राम कदमां विरुद्ध समस्त महिलावर्गाकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत होता. राम कदमांनी महिलांप्रती केलेल्या वादग्रस्त विधानाने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या होत्या. त्यावेळी एका मराठा तरूणीने भाजप आमदार राम कदम यांना ओपन चॅलेंज दिल होतं.

त्यावेळी त्यात मीनाक्षी डिंबळे पाटील या तरूणीने आमदार राम कदम यांना खुलं आवाहन दिल आहे की, ‘राम कदम तुम्हाला मी चॅलेंज करते, मला तुम्ही मुंबईला बोलवा किंवा मी मी मुंबईत येते. आल्यानंतर मला फक्त बोटाने स्पर्श करून दाखवा, उचलून न्यायची गोष्ट तर लांबच राहिली. त्याबद्दल मी नंतर बघते. तुम्ही जे वक्तव्य ते अत्यंत लांछनास्पद आहे. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे इथे स्त्रियांचा आदर केला जातो. स्त्रीला देव्हाऱ्यातली देवी समजतात. त्यामुळे तुमच्या या घाणेरड्या वक्तव्यांची महाराष्ट्रात जागा नाही. तुम्ही जे बोलला आहात त्याबद्दल मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. आपण आमनेसामने भेटून बोलू. तुम्हाला मी फोन केला होता पण तुम्ही उचलला नाही. आता तुमच्या फोनची मी वाट बघते आहे. तुम्ही फोन करा आणि माझे चॅलेंज स्वीकारा अशीच माझी अपेक्षा आहे.” अशा शब्दात या मुलीने आपला निषेध नोंदवत भाजप आमदार राम कदम यांना समाज माध्यमांवरून खुले आव्हान दिले होते. शिवप्रेमी नेहमीच महिलांचा आदर करतात हे सर्वश्रुत आहे आणि तेच महाराजांचे संस्कार होते. मात्र आजच्या प्रकारावेळी राम कदम यांनी स्वतःला वारकरी झालं आता शिवप्रेमी देखील जाहीर करून टाकल्याने समाज माध्यमांवर टीका करणं सूर झालं आहे.

 

Web Title:  BJP MLA Ram Kadam says we will file a police complaint against Shivsena MP Sanjay Raut.

हॅशटॅग्स

#MLARamKadam(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x