19 January 2025 11:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा New Tax Slab | वार्षिक पगार 15 लाख तरीही जुनी टैक्स प्रणाली सर्वोत्तम, नवीन टॅक्स स्लॅब कोणासाठी फायदेशीर जाणून घ्या IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा
x

यूपीच्या मजुरांचा प्रवास, मुख्यमंत्र्यांऐवजी हेमामालिनी राज्यपालांच्या भेटीला

MP Hema Malini, Bhagat Singh Koshari

मुंबई, ११ मे: मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी. मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली.

पंतप्रधानांनी आज देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मुद्दे मांडले. लॉकडाऊनच्या बाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. गेल्या दोन महिन्यांपासून सर्व जण अडकले आहेत. महाराष्ट्राने साडे पाच लाख मजुरांच्या निवारा व नाश्ता, भोजनाची व्यवस्था चोखपणे ठेवली तसेच इतर राज्यांशी समन्वय ठेऊन मजुरांना पाठवणे सुरु केले आहे, असेही ठाकरे म्हणाले.

दुसरीकडे, मजूरांना त्यांच्या गावी सुरक्षितपणे पोहचण्यासाठी खासदार हेमा मालिनी यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि विशेषतः मथुरा येथे परत जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल चर्चा केली.

 

News English Summary: MP Hema Malini on Monday called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan to ensure that the workers reach their villages safely. Mathura MP Hema Malini on Monday paid a courtesy call on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan.

News English Title: BJP MP Hema Malini meet governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan discussed safe travel of workers from Maharashtra to Uttar Pradesh State News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x